Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची शरद पवार आणि मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका. महाराष्ट्रात ओबीसींचा अंडरकरंट असल्याचा दावा
जालना: शरद पवार यांनीच महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत बसवलं, अशी टीका ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली. शरद पवार यांना मराठा समाजाच्या , ओबीसीच्या आरक्षणाचे (OBC Reservation) काहीही पडलेले नाही. त्यांना फक्त आपली लेक मुख्यमंत्री करायची आहे, असे हाके (Laxman Hake) यांनी म्हटले. ते रविवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
विशालगडावर मशीद पाडताना संभाजी भोसले चिथावणीखोर भाषण करत होता. एकही धनगर आमदार-खासदार झाला नाही. आमचा पाठिंबा आमच्या उमेदवारांना आहे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्ही महायुती कडे जाऊ, असे हाकेंनी सांगितले. माझे मित्र उत्तम जानकर, धनगरांच्या मतासाठी राजेश टोपेसाठी धनगरांचा नेता म्हणून प्रचारासाठी आला. उत्तम जानकर माळशिरसमध्ये एससीच्या सर्टिफिकेटवर त्या मतदारसंघात निवडणूक कशी काय लढत आहेत? जयंत पाटील, शरदचंद्र पवार, रोहित पवार यांनी उत्तम जानकर हे धनगर आहेत की SC आहेत, हे सांगावे. ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना माझी विनंती आहे, आपलं बहुमूल्य मत योग्य त्या माणसाला योग्य त्या व्यक्तीला द्या. ज्या राजकारणांनी जरांगेंना लेखी पत्र दिले तीच लोक आज आपल्या वस्ती आणि तांड्यावर मत मागायला येत आहेत. त्यांच्याकडून आश्वासन घेतल्याशिवाय त्यांना जाब विचारल्याशिवाय मतदान करायचं नाही, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले.
महाराष्ट्रात ओबीसींचा अंडरकरंट आहे: लक्ष्मण हाके
महाराष्ट्रात ओबीसींचा अंडरकरंट आहे. या निवडणुकीत 20 ते 25 विधानसभेमध्ये प्रतिनिधी आमदार पाठवणार, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊनही मनोज जरांगे जराही समाधानी नाही. जरांगे नावाचा खुळचट माणूस आम्ही गरजवंत म्हणतो.
घटनादुरुस्ती करुन दिलेलं इब्ल्यूएस आरक्षण नाकारतो. याचा अर्थ तो कोणाच्यातरी स्क्रिप्ट वर तो काम करत आहे. जरांगेने विधानसभा निवडणुकीतून पळ काढला. जरांगेने शेपूट घालून फक्त येवल्यात गेला. जरांगेकडे निवडणूक लढवण्यासाठी कोणताही भांडवलं नव्हतं, 287 मतदारसंघात तो गेला नाही. फक्त छगन भुजबळ यांच्याच मतदारसंघात गेला. महाराष्ट्र तुमच्या बापाची जहागिरी आहे का? भुजबळ यांच्या स्टेजजवळ सभा घेऊन त्यांच्यावर हल्ला करायचा होता का? कुणबी आणि मराठा वेगवेगळे आहेत, जरांगेने लोकांना वेड्यात काढले. जरांगेच्या मागण्यांना शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे ओबीसी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. पवार साहेबांची तुतारीची टोळी महाराष्ट्रात भामटेगिरी करत आहे, घटनेशी द्रोह करत आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीने ओबीसी उमेदवारांना तिकीटं दिली. महाविकास आघाडीच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवार टार्गेट करून पाडले. पंकजा मुंडेंचा आणि महादेव जानकर यांचा पराभव मराठवाडा विसरलेला नाही. चंद्रकांत खैरे यांचा पराभव का झाला ? शरद पवार आणि रोहित पवारांची वॉररुम कुणासाठी काम करत होती?, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
जालना विधानसभा मतदारसंघात लक्ष्मण हाके अपक्ष उमेदवाराच्या पाठिशी
जालना येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर यांना पाठिंबा दिला आहे. जालन्यात अपक्ष उमेदवार पांगारकर यांनी ठेवलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सहभागी होऊन ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाने अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे यावेळी आवाहन केले. लक्ष्मण हाके हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून ते ओबीसी नेत्यांसाठी प्रचार बैठका घेताना दिसत आहेत.
आणखी वाचा