Sharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणी
Sharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणी
विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, या निवडणुकीत नेतेमंडळींच्या साहित्य तपासणीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साहित्याची तपासणी होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चांगलाच गजहब उडाला होता. त्यानंतर आता खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याही साहित्याची तपासणी होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नरेंद्र मोदी यांचीही तपासणी होणार का? राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे निवडणूक अधिकारी नेत्यांच्या साहित्याची तपासणी करतात. काही दिवसांपूर्वी अशीच तपासणी उद्धव ठाकरे यांच्या साहित्याची करण्यात आली होती. एकीकडे तपासणी चालू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत धारेवर धरलं होतं. माझी ज्या पद्धतीने तपासणी केली जात आहे, तशीच तपासणी भाजपाचे नेते अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार का? असा सवाल त्यांनी केला होता. ठाकरेंच्या साहित्याच्या या तपासणीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शरद पवार यांच्याही साहित्याची तपासणी उद्धव ठाकरेंच्या साहित्याची तपासणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही साहित्याची तपासणी केली जात असल्याचे काही व्हिडीओ समोर आले होते. निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांना ही तपासणी करावीच लागते. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे मत महायुतीच्या नेत्यांनी मांडले होते. त्यानंतर आता शरद पवार यांच्याही साहित्याची तपासणी झाल्याचे समोर आले आहे.