Devendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीस
हेही वाचा :
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीला बारामतीमधील जनता कोणत्या पवारांच्या पाठीशी उभी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगताणा दिसणार आहे. अजित पवारांनी आज बारामतीमध्ये गावभेट दौऱ्यावर असताना शरद पवारांनंतर बारामतीकरांसाठी वाली कोण आहे, असा सवाल करत मतदारांना आवाहन केलं आहे. काही भावनिक झालात तर त्यांची मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल, परत बारामतीकरांना पुन्हा वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलं मी दीड वर्षांनी निवडणूक लढविणार नाही आणि खासदार पण होणार नाही, त्यानंतर कोण बघणार आहे, त्यावर लक्ष्य द्या असं अजित पवार म्हणालेत, त्यावर शरद पवारांनी चोख उत्तर दिलं आहे.
शरद पवारांनी अजित पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, 'लोकांनी गंमत काय केली. त्यांनी लोकशाही पद्धतीने मतदान केलं. त्यांना मतदान केलं नाही एवढंच ना. लोकांचा अधिकार आहे. लोकांनी कुणालाही मतदान केलं. उद्या कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख. म्हण बाबा माझी काय तक्रार. लोकांनी म्हटलं पाहिजे ना. मी म्हणून काय उपयोग', अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.