एक्स्प्लोर
नाशकात चिरीमिरी घेताना टोईंगवाले कॅमेऱ्यात कैद, 5 जण निलंबित
टोईंगवाल्यांची दादागिरी आता नवीन विषय राहिला नाही. मात्र, याच टोईंगवाल्यांची नवी काळी बाजू आता समोर आली आहे. सध्या नाशकात दुचाकी टोईंग न करता परस्पर पैसे उकळण्याचे प्रकार सुरु आहेत.

नाशिक : टोईंगवाल्यांची दादागिरी आता नवीन विषय राहिला नाही. मात्र, याच टोईंगवाल्यांची नवी काळी बाजू आता समोर आली आहे. सध्या नाशकात दुचाकी टोईंग न करता परस्पर पैसे उकळण्याचे प्रकार सुरु आहेत. नो पार्किंगमध्ये असलेली एका महिलेची दुचाकी टोईंग केली खरी, पण 100 रुपयांच्या मोबदल्यात टोईंगवाल्यांनी गाडी जागेवरच सोडली. या सर्व प्रकाराबाबत आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. या प्रकरणाचा तपास एका पोलीस निरिक्षकाकडे देण्यात आला असून टोईंग व्हॅनवरील 5 मुलांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. तसेच त्यादिवशी त्या वाहनावर कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसाची देखील चौकशी सुरु असून ती होईपर्यंत त्याची ट्राफिक कंट्रोल रुमला बदली करण्यात आल्याच त्यांच्याकडून सांगण्यात आला. आधीच दादागिरीसाठी टोईंगवाल्यांची राज्यभरात मोठी दहशत आहे. नाशकात पार्किंगची मोठी समस्या आहे. त्याहून मोठी समस्या आहे ती टोईंगवाल्यांची. खरं तर, टोईंगवाल्यांच्या गाडीवर ट्रॅफिक पोलीस असतात. त्यांच्याकडून अधिकृत पावतीही फाडली जाते. तसं असून देखील खुलेआम पैसे उकळले जातात. किमान आता तरी या टोईंगवाल्यांवर आणि त्यांच्यासोबत फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नाशिककर करत आहेत.
आणखी वाचा























