एक्स्प्लोर
जवानांची व्यथा मांडणाऱ्या नाशिकमधील बेपत्ता जवानाचा मृत्यू
नाशिक: बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडल्यानं नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे. रॉय मॅथ्यू असं त्या 33 वर्षीय जवानाचं नाव असून, तो केरळचा रहिवासी आहे.
काही दिवसांपूर्वी जवानांची व्यथा मांडणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये मॅथ्यू दिसला होता. त्यामुळे त्या वादाशी मॅथ्यूच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? याचा शोध घेतला जात आहे.
कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाच होत असल्याचा आरोप या व्हिडिओत करण्यात आला होता. त्यात मॅथ्यू वरिष्ठ अधिकाऱ्याची कामं करताना दिसत होतं. त्यामुळे मॅथ्यूची चौकशीही सुरु होती. त्यामुळे तो प्रचंड तणावात होता, असा दावा त्याच्या परिवाराचा आहे.
25 तारखेपासून मॅथ्यू बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. पण काल त्याचा मृतदेह देवळाली कॅम्पमधल्या एका निर्मनुष्य भागात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, मॅथ्यूचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement