एक्स्प्लोर
नाशिकमधील मुंबई नाका परिसरात 1 कोटीच्या जुन्या नोटा जप्त
नाशिक : नाशिकमधील मुंबई नाका परिसरात एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचा यात समावेश आहे.
मुंबई नाका येथील द्वारका परिसरातून क्झायलो कारमधून पोलिसांनी एक कोटींची रक्कम जप्त केली. यात सर्व 500 आणि 1000 जुन्या नोटा होत्या.
या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, यात नाशिकमधील सराफ व्यावसायीकाचाही समावेश आहे.
दरम्यान, काळ्या पैशाविरोधात कडक पाऊल उचलण्यासाठी मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. मात्र, नोटाबंदीनंतर देशभरातील अनेक ठिकाणी जुन्या नोटा सापडत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement