एक्स्प्लोर

विखेंना भाजपात घेऊन तोटाच झाला; माजी मंत्री राम शिंदेंची इनकमिंगवर नाराजी

राधाकृष्ण विखे पाटलांसह भाजपात झालेल्या इनकमिंगवर माजी मंत्री राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केलीय. विखेंचा पक्षाला फायदा न होता उलट तोटा झाल्याचेही ते म्हणाले.

नाशिक : राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपात घेऊन काही फायदा झाला नाही. झाला तो उलट तोटाच, अशा शब्दात माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील आणि एकूणच झालेल्या इनकमिंगवर नाराजी व्यक्त केलीय. पक्षातील काही नेत्यांनी विरोधात काम केल्याचा आरोपही राम शिंदेंनी केलाय. भाजपमधील पराभूत झालेल्या 12 उमेदवारांची बैठक आज नाशिकमध्ये पार पडली. यावेळी एबीपी माझाशी बोलतानी राम शिंदे यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. या बैठकीला एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेही अनुपस्थित राहिल्या. वैयक्तिक कारणानं आपण बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचं रोहिणी खडसेंनी स्पष्ट केलंय. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. विखे ज्या पक्षात जातात तिथं खोडी करतात - "राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेतल्यानंतर ते म्हणाले होते, की नगरमध्ये 12-शून्य करू, मात्र तसं काहीही न होता. उलट आमच्या आहे, त्यापैकी दोन जागा कमी झाल्या. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपात घेऊन काही फायदा झाला, असं मला वाटत नाही", असं म्हणत माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील आणि एकूणच झालेल्या इनकमिंगवर नाराजी व्यक्त केली. राधाकृष्ण विखे-पाटील आणि मधुकर पिचड पक्षात आल्यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या सातवर गेली होती. परिणामी ही संख्या वाढण्याची अपेक्षा असताना कमी झाली. असं सांगत विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षात खोडी करतात, अशी टीका राम शिंदे यांनी केली. स्नेहलता कोल्हे, कर्डिले यांचाही विखे-पाटलांवर आरोप - कोपरगाव, राहुरी मतदारसंघातील पराभूत उमेदवार अनुक्रमे स्नेहलता कोल्हे आणि शिवाजी कर्डिले यांनीही विखेंचा फायदा झाला नसल्याचे सांगितले. विखे यांनी त्यांच्या मेहुण्याला कोपरगाव मतदारसंघातून अपक्ष उभे केले. मात्र, त्यांचं डिपोजीट जप्त झाल्याचे कोल्हे यांनी सांगितले. एकप्रकारे पक्षातील नेत्यांनीच विरोधात काम केल्यामुळे पराभव झाल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी माझाशी बोलताना सांगितले. तर, शिवाजी कर्डिले यांनीही भाजपला आयात लोकांचा तोटाच झाल्याचे सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे अनुपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 12 डिसेंबरला गोपीनाथगड येथे झालेल्या मेळाव्या एकनाथ खडसेंनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. त्याकारणामुळे तर रोहिणी खडसे गैरहजर राहिल्या नाहीत ना? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. हेही वाचा - 80 तासांचं सरकार पाहून आनंद नाही तर धक्का बसला : पंकजा मुंडे आम्ही नेहरू, गांधींना मानतो तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका; संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा Ram Shinde | इनकमिंगचा भाजपला फायदा झाला नाही, राम शिंदे यांनी व्यक्त केली नाराजी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 News : Superfast News : टॉ 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 March 2025 : ABP MajhaPune MNS Supporter : राज ठाकरेंना ऐकण्यासाठी पुण्यातील कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवानाABP Majha Marathi News Headlines 6 PM Top Headlines 6 PM 30 March 2025 संध्याकाळी 6 च्या हेडलाईन्सPunekar On Gold Rate : साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा, सोनं खरेदीसाठी पुणेकरांची लगबग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Hemant Nimbalkar : कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निबाळकरांना मुख्यमंत्री पदक
कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निबाळकरांना मुख्यमंत्री पदक
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Trimbakeshwar Temple : आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
पतंजलीनं आयुर्वेदाला आधुनिक जगाशी जोडलं, प्राकृतिक चिकित्सेला कसं मजबूत बनवलं?
पतंजलीनं आयुर्वेदाला आधुनिक जगाशी जोडलं, प्राकृतिक चिकित्सेला कसं मजबूत बनवलं?
Embed widget