एक्स्प्लोर
पोलीस भरतीत उंचीसाठी केसांचा विग, तरुणाचा पर्दाफाश
नाशिक : पोलीस भरतीमध्ये निवड होण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या शकला लढवल्या जातात. नाशिकमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये पोलीस तपासणीवेळी उंची वाढावी म्हणून एका तरुणानं चक्क बनावट केसांचा विग डोक्याला चिकटवला.
नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पोलीस भरतीवेळी एका तरुणानं आपली उंची 175 सेंमीच्यावर दिसावी यासाठी विग घातला. तपासणीवेळी त्याची उंचीही जास्त मोजली गेली. मात्र एका पोलीस कॉन्स्टेबलला संशय आल्यानं त्यानं तरुणाची पुन्हा नीट तपासणी केली. यावेळी त्याच्या डोक्यावर विग आढळला आणि त्याचं बिंग फुटलं.
दरम्यान या प्रकारानंतर या तरुणाला संपूर्ण भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आलं आहे. तसंच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement