एक्स्प्लोर
माथेफिरुच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, जमावाने माथेफिरुलाही संपवलं
भास्कर जोपले या मनोरुग्णाने कुऱ्हाड आणि दगडाने केलेल्या मारहाणीत दोघांना प्राण गमवावे लागले होते.

नाशिक : माथेफिरुच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशकात घडली आहे. या प्रकारानंतर संतप्त जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भास्कर जोपले या मनोरुग्णाचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोरुग्णाच्या हल्ल्यात राही बागुल या 45 वर्षीय महिलेचा आणि गुलाब पालवी या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. भास्कर जोपले या मनोरुग्णाने कुऱ्हाड आणि दगडाने केलेल्या मारहाणीत दोघांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर संतप्त जमावाने भास्करला मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र गंभीर जखमी केलेल्या माथेफिरुचा वाणी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यात वांजुळपाडा भागात पोलिसांच्या समक्ष महिलेवर त्याने हल्ला केला होता
आणखी वाचा























