एक्स्प्लोर
नाशकात भररस्त्यात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
गंगापूर पोलिसात परस्परविरोधी हाणामारी, जबरी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : नाशिकच्या आनंदवली परिसरात दिवसाढवळ्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तिघे जण जबर जखमी झाले आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.
बुधवारी नाशिकमधल्या आनंदवली परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी झाली. गंगापूर पोलिसात परस्परविरोधी हाणामारी, जबरी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
दोघं जण खंडणी मागायला आल्यानंतर हा वाद उफाळल्याची माहिती आहे. सुनील गुलाब ढोके, सचिन साहेबराव पगार आणि सागर संजय गरड हे तिघे जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सुनील ढोकेची प्रकृती गंभीर आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement





















