एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोलिस असल्याचं सांगून नाशकात दागिन्यांसह पर्सचोरी
पोलिस असल्याचं सांगून महिलांना दंग्याची भीती दाखवत अंगावरचे दागिने पर्समध्ये ठेवायला लावायचे. त्यानंतर ही पर्सच हिसकावून पळून जायचं, अशी मोडस ऑपरेंडी असलेली चोरांची टोळी नाशिकमध्ये कार्यरत आहे.
नाशिक : पोलिस असल्याचं सांगत महिलेचे दागिने लुटल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. पल्सर बाईकवरुन आलेल्या एका भामट्याने ही चोरी केली असून चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
नाशकातील शंकरनगर टाकळी रोडवरुन जाणाऱ्या सकिना जावरवाला यांना एका दुचाकीस्वारानं पोलिस असल्याचं सांगत अडवलं. 'पुढे तणाव निर्माण झाला असून खूप गर्दी आहे. त्यामुळे आपल्या अंगावरचे दागिने काढून पर्समध्ये ठेवा.' असं त्या भामट्याने सकिना यांना सांगितलं.
त्याच्यावर विश्वास ठेवून सकिना यांनी अंगावरचे दागिने काढले आणि पर्समध्ये ठेवले. मात्र काही कळायच्या आतच तो भामटा पर्स घेऊन फरार झाला. सकिना यांनी आरडाओरडा करताच खऱ्या पोलिसांनी धाव घेतली. मात्र तो पर्यंत हा चोरटा फरार झाला होता.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. पोलिस असल्याचं सांगून महिलांना दंग्याची भीती दाखवत अंगावरचे दागिने पर्समध्ये ठेवायला लावायचे. त्यानंतर ही पर्सच हिसकावून पळून जायचं, अशी मोडस ऑपरेंडी असलेली चोरांची टोळी नाशिकमध्ये कार्यरत आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून नागरिकांनी अशा भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement