एक्स्प्लोर
Advertisement
हत्येचा कट रचल्याप्रकरणी भाजप नगरसेवक हेमंत शेट्टीला अटक
नाशिक: नाशिकमधील भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना काल (शुक्रवार) रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी हेमंत शेट्टी यांना बेड्या ठोकल्या आहेत.
जालिंदर उगलमुगले या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांनी दिलेल्या जवाबानुसार हेमंत शेट्टी यांना पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अखेर चौकशीअंती पोलिसांनी त्यांना अटक केली. तब्बल 20 महिन्यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे.
काम आहे नेमकं प्रकरण:
जालिंदर उगलमुगले हा 1 ऑक्टोबर 2015 पासून बेपत्ता होता. जालिंदर बेपत्ता असल्याची त्याच्या कुटुंबीयांनी तक्रारही केली होती. त्यानंतर जालिंदरसोबत घातपात झाली असल्याची भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्र वेगानं फिरवली.
जालिंदर उगलमुगले
यावेळी तब्बल पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी दिलेल्या जवाबानुसार, जालिंदर याला सुरुवातील इगतपुरी येथे नेऊन त्याची हत्या करण्यात आली. त्याच ठिकाणी त्याला जाळून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावण्यात आहे. हे आपण हेमंत शेट्टींच्या सांगण्यावरुन केलं असल्याची कबुली पाचही आरोपींनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी हेमंत शेट्टींना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेतलं जात असल्याचा आरोप होत असताना भाजपच्याच नगरसेवकाला हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे. त्यामुळे आता तरी भाजप याबाबत काही ठोस भूमिका घेणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement