एक्स्प्लोर
नाशिक महापालिकेतील 9 माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला
नाशिक : नाशिक महापालिकेची यंदाची निवडणूक महापौर राहिलेल्या राजकीय घराण्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. महापालिकेच्या इतिहासातील आतापर्यंत होऊन गेलेल्या 13 महापौरांपैकी 9 माजी महापौरांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
सहा माजी महापौरांचे कुटुंबीय त्यांचे राजकीय वारसदार म्हणुन निवडणुक लढत आहेत, तर तीन माजी महापौर स्वत: उमेदवार म्हणून सध्या रिंगणात आहेत.
1982 साली नाशिक महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर सुरुवातीची दहा वर्ष प्रशासकीय राजवट राहिली. नंतर 1992 साली महापालिकेचे पहिले महापौर होण्याचा मान स्व. शांताराम बापू वावरे यांना मिळाला होता. आता वावरेंचे वारसदार राजकारणाच्या आखाड्यात नसले तरी त्यानंतरच्या अनेकांचे वारसदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
माजी महापौरांचे कोण-कोण नातलग रिंगणात?
स्व. पंडीतराव खैरेंचे वारसदार असलेले शाहु खैरे आणि वत्सला खैरे हे दीर-भावजय
वसंत गीते यांचा मुलगा प्रथमेश
अशोक दिवेंची दोन्ही मुलं राहुल आणि प्रशांत
दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम, भाऊ दिनकर आणि पुतण्या अमोल
बाळासाहेब सानप यांचा मुलगा मच्छिंद्र
विनायक पांडे यांची वहिनी कल्पना पांडे
दुसरीकडे मागील आठ वर्षात नाशिकचे महापौर राहिलेले तिघे महापौरही निवडणुक लढत आहेत. त्यात नयना बबनराव घोलप, मनसेचे प्रथम महापौर यतिन वाघ आणि विद्यमान महापौर अशोक मुर्तडक हे स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement