एक्स्प्लोर
एक-दोन नव्हे, 28 फुटांचा केक, तीन मजली उंची

नाशिक : उंच खांब किंवा टॉवर सारखा दिसत असला तरी फोटोत दिसणारा तब्बल 28 फूट उंचीचा केक आहे. नाशिकमधील पंचवटी महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी हा केक साकारला आहे.
साडेचारशे किलोंचा हा केक ब्रेड आणि बेकरीजन्य पदार्थांपासून बनवण्यात आला. सध्या हा केक पंचवटी कॉलेजची शोभा वाढवत आहे. तब्बल तिसऱ्या मजल्यापर्यंत केकची उंची पोहोचली आहे. पाच दिवस हा केक कॉलेजमध्ये प्रदर्शनासाठी ठेवला जाणार आहे.
शाही कार्यक्रमात मोठ-मोठे केक आपण बघतो. पण विद्यार्थ्यांनी साकारलेला हा भव्य केक नाशिककरांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे. या केकची चव चाखण्याची संधी कधी मिळणार, याची उत्सुकता नाशिककरांना लागून राहिली आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















