जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरील स्थगिती उठवली; मंत्री दादा भुसेंची माहिती
District Planning Committee Fund : मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरील स्थगिती उठवल्याची माहिती दिली.
नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. बंदरे व खनिजकर्म मंत्री दादा भुसे यांनी याबाबची माहिती दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामातील निधीचं न्याय वाटप करणार आहोत. आधी निधी वाटपात असमतोल होता. काही तालुक्यात खूप खर्च, तर काही तालुक्यात निधी कमी असे होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात बदल करणार अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.
मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शेवटच्या बैठकीत निधी वाटप केला होता. मंत्री भुसे यांच्या या निर्णयामुळे छगन भुजबळ यांना नव्या पालकमंत्र्यांनी दणका दिल्याचे बोलले जात आहे.
नफेडची कांदा खराब झाला त्याची चौकशी करण्याचे दखील दादा भुसे यांनी यावेळी आदेश दिले आहेत. याबरोबरच नाशिक मनपा हद्दीत 15 ब्लॅक स्पॉट आढळले आहेत. दिवाळीपूर्वी तिथे उपाययोजना केली जाईल. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, त्याचे पंचनामा करून सरकारला अहवाल दिला जाणार आहे. वीजेचा जळलेला ट्रेसनफार्मर दोन तीन दिवसात दुरुस्त करावा, दिवाळीत वीजपुरवठा खंडित नसावा अशा अनेक सूचना दादा भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.
आगामी कुंभमेळ्यासंदर्भात देखील दादा भुसे यांनी सूचना दिल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करावे, जनतेच्या सूचनांसाठी पोर्टल तयार करणे. त्यावर दोन तीन महिन्यात जनतेच्या सूचना घेणार. सप्तश्रृंगी गडावर वाढती गर्दी लक्षात घेता नवा विकास आराखडा तयार करणार. आरोग्य शिक्षण यावर भर देणार, यासह दादा भुसे यांनी नाशिक-मुंबई महामार्गवरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत.
दादा भुसे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शंभर शाळा मॉडेल स्कूल करणार. शाळा आणि शासकीय दवाखाना सौर उर्जेवर चालविण्यासाठी प्रयत्न करणार. त्यामुळे वीजेचे बील आणि वीज वापरात बचत होईल. याबोतच नाशिकमधील हुतात्मा स्मारक नूतनीकरण करणार, तिथे वाचनालय सुरू करणार.
नाशिमधील अपघातातील मृतदेहांची 9 जणांची ओळख पटली आहे. आणखी तीन जणांची ओळख पटायची आहे, अशी माहिती यावेळी दादा भुसे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या