एक्स्प्लोर

Nashik Bus Fire : नाशिक अपघातानंतर दोन दिवस उलटले, आश्वासनांचं काय झालं? 'ती' चौफुली अजूनही मृत्यूचा सापळा

Nashik Bus Fire : नाशिक (Nashik) औरंगाबाद रोडवरील अपघाताला दोन दिवस उलटून गेले असले तरी प्रशासनकडून अद्यापही ठोस पाऊले उचलले गेली नसल्याचे चित्र आहे. 

Nashik Bus Fire : नाशिक (Nashik) औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौफुली जवळ शनिवारी सकाळी पहाटेच्या सुमारात बस आणि ट्रक अपघात (Nashik Bus Fire) झाला आणि यामध्ये 12 जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह (CM Eknath Shinde) इतर आजी माजी पालकमंत्री, त्याच पाठोपाठ स्थानिक लोकप्रतिनिधी अपघातस्थळी पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र अपघाताला दोन दिवस उलटून गेले असले तरी प्रशासनकडून अद्यापही ठोस पाऊले उचलले गेली नसल्याचे चित्र आहे. 

दोन दिवसांपूर्वी नाशिककरांना सुन्न करणारी दुर्दैवी घटना शहरातील औरंगाबाद रोडवर क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. जवळपास बारा प्रवाशांना या अपघातात  गमवावा लागला. त्यानंतर या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर पालकमंत्री दादा, खासदार हेमंत गोडसे स्थानिक पोलीस प्रशासनांसह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची पाहणी केली. यानंतर तात्काळ मिरची चौफुलीवर म्हणजेच ज्या ठिकाणी अपघात झालेला होता. त्या ठिकाणी रस्ते उपपयोजना करण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये गतिरोधक असेल, पांढरे पट्टे असतील, सिग्नल यंत्रणा याचबरोबर इतर ज्या काही सुविधा वाहतुकीसाठी करण्यात येतील त्या करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

मात्र या भीषण अपघातास दोन दिवस उलटूनही अद्याप प्रशासनकडून कोणतीही ठोस पाऊले उचलण्यात आली नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. दरम्यान अपघातानंतर दिलेल्या सुचनांचा तात्काळ पाठपुरावा होईल मात्र आजही परिस्थिती जैसे थे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे केवळ आश्वासने द्यायची, आणि वेळ मारून न्यायची आणि जैसे थेच परिस्थिती ठेवायची असाच एकंदरीत प्रशासनाचा कारभार आहे का? हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.  आज देखील सदर चौफुलीवर भरधाव वेगाने वाहने सुसाट जात आहेत. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असली तरी न जुमानता वाहने बेदरकारपद्धतीने चालवली जात असल्याने प्रशासन आणखी अपघात होण्याची वाट बघतंय का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

दोन दिवसानंतरही उपाययोजना नाहीच! 
दरम्यान नाशिकच्या बस ट्रक अपघाताला दोन दिवस उलटूनही अद्यापही या चौफुलीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. दोन दिवसात काम सुरु होईल, असे आश्वासन अपघात झाला त्या दिवशी देण्यात आले होते. मात्र आता दोन दिवस उलटूनही काहीच काम झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. शिवाय पुढील काही दिवसात उपायोजना न राबविल्यास स्थानिक नागरिकांकडून प्रशासनांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sunil Tatkare : शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar : Walmik Karadला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट सुरु;संदीप क्षीरसागर आक्रमकRohit Pawar Full PC : नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा, रोहित पवारांचा रोख कुणावर?Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 08 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sunil Tatkare : शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
Commenting on Women Figures : महिलांच्या फिगरवर कमेंट करणे गुन्हाच! मेसेजमध्ये सतत सेक्शुअल कमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा झटका
महिलांच्या फिगरवर कमेंट करणे गुन्हाच! मेसेजमध्ये सतत सेक्शुअल कमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा झटका
Pune News: वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरीवर पाणी? पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई, हाती दिला नारळ, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय!
वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरीवर पाणी? पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई, हाती दिला नारळ, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय!
VIDEO Sarangi Mahajan : पंकजा-धनंजयने जमीन हडपली, वाल्मिकच्या माणसांनी धमकी दिली; प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांचा आरोप
पंकजा-धनंजयने जमीन हडपली, वाल्मिकच्या माणसांनी धमकी दिली; प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांचा आरोप
Sam Konstas : मिशाही न फुटलेल्या काॅन्स्टासला धक्का देताच राडा, दंडही झाला, आता त्याच काॅन्स्टासकडून कोहलीचं 'विराट' कौतुक! दोघांमध्ये काय बोलणं झालं ते सुद्धा सांगितलं
मिशाही न फुटलेल्या काॅन्स्टासला धक्का देताच राडा, दंडही झाला, आता त्याच काॅन्स्टासकडून कोहलीचं 'विराट' कौतुक! दोघांमध्ये काय बोलणं झालं ते सुद्धा सांगितलं
Embed widget