एक्स्प्लोर
शिवसेना खासदार हेमंत गोडसेंची मुख्याध्यापकाला धक्काबुक्की
नाशिक : बार्न्स स्कूलच्या मुख्याध्यापकांना शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी धक्काबुक्की केली आहे. बार्न्स स्कूलमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाकडे दुर्लक्ष केल्याने एका कर्मचाऱ्याने सकाळी नैराश्यातून आत्महत्या केली. त्यानंतर खासदार हेमंत गोडसेंनी जाब विचारायला गेले असताना मुख्याध्याकांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.
प्रकरण काय आहे?
वर्षानुवर्ष कार्यरत असलेल्या 68 कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी आणि ऊर्वरीत कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीने कार्यरत करुन घेण्याचे आदेश न्यायालयानं स्कूल प्रशासनाला दिले आहेत. मात्र, तरीही बार्न्स स्कूलने युनियन आणि स्थानिक राजकीय नेत्याला हाताशी धरुन बाहेरगावची मुलं तात्पुरत्या स्वरुपात भरती करुन घेतली आणि या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावलं. याविरोधात हे 94 कर्मचारी गेल्या 8 महिन्यापासून स्कूल प्रशासनाशी संघर्ष करत आहेत.
शिक्षक चिन्नप्पा मांद्रे यांची आत्महत्या
अनेकदा आंदोलनं, चर्चा, विनवण्या करुन झाल्या तरीही स्कूल प्रशासन कामावर रुजू करुन घेत नसल्याने कर्मचाऱ्यांची उपासमार होत होती. दक्षिणेतल्या राज्यातून इथं विस्थापित झालेला चिन्नप्पाही त्यातलाच एक कर्मचारी होता. प्रपंच कसा चालवायचा, मुला-बाळांचे पोट कसे भरायचे या विवंवचेत असलेल्या चिन्नप्पाने मंगळवारी सकाळी अखेर शाळेच्या प्रवेशद्वारासमरोच आत्महत्या केली. सकाळी शाळेत आलेल्या मुलांनी सर्वप्रथम चिन्नप्पाचा मृतदेह पाहिला. त्यानंतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकच गर्दी केली.
प्राचार्य, संस्थाचालकांविरोधात कर्मचारी आक्रमक
संतापलेल्या काही कर्मचाऱ्यांनी युनियनचा अध्यक्ष चव्हाण याला मारहाणही केल्यानं तणाव निर्माण झाला. मोठा पोलीस फौजफाटा मागवण्यात आला. प्राचार्य आणि संस्थाचालकांना अटक होत नाही तोपर्यंत चिन्नप्पाचा मृतदेह झाडावरुन काढू नये, अशी मागणी करत कर्मचारी आक्रमक झाले.
हेमंत गोडसेंची मध्यस्थी
अखेर खासदार हेमंत गोडसे यांनी समजूत काढल्यानंतर 3 तासानं आंदोलकांनी पोलिसांना पंचनामा करु दिला. या घटनेमुळं शाळा प्रशासनांची मुजोरी आणि ठेकेदारी करणाऱ्या राजकीय नेत्यांची कशी साथ मिळते, हे पाहायला मिळालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement