एक्स्प्लोर

Gramanchayat Election : नाशिकच्या 82 ग्रामपंचायतीसाठी अंदाजे 80 टक्के मतदान, मतमोजणीची उत्सुकता शिगेला 

Nashik : जिल्ह्यात या आधीच सहा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने 82 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.

नाशिक: जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून भर पावसात सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेत खंड न पडता साधारण 80 टक्के मतदान झाले. यंदा प्रथमच थेट सरपंच पदासाठी निवडणूक झाल्यामुळे मतदारांसह उमदेवारांमध्येही उत्सुकता असून तीनही तालुक्यात मतदान शांततेत झाले. दरम्यान प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी प्राप्त झाली नसल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. 

नाशिक जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींसाठी 284 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. एकूण 88 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असून यापैकी सहा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने 82 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक मतदान झाले. आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मतदानावर काहीसा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात असतांना मात्र सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग लागल्याचे दिसून आले. नाशिक तालुक्यातील 16, दिंडोरीतील 46 तर कळवण मधील 20 अशा एकुण 82 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात झाली. सहा ग्रामपंचायती आगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. सकाळी 7.30 वाजेपासून सुरवात झाल्यानंतर दुपारी दीड वाजेर्पंत 58.74 टक्के इतके मतदान झाले. 

जिल्ह्यातील तीन तालुक्यात मतदानाचा बिगुल वाजला असून सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चा परिणाम होतो की काय असा अशी शंका सध्या उमेदवारांसह कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक कळवण दिंडोरी या तालुक्यांमध्ये सध्या 88 ग्रामपंचायतींमध्ये मतदान सुरू आहे. या मतदान  प्रक्रियेसाठी 1746 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना मात्र पावसाने खोळंबा घातला असला तरी मतदार मात्र न चुकता मतदान करत असल्याने चित्र आहे. 

दरम्यान आज 82 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारास कार्यकर्त्यांच्या नजर उद्याच्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. शिवाय उद्या मतमोजणीनंतर कुणाच्या पारड्यात जनतेचा कौल जाणार? जनता कुणाला गावाचा कारभारी करणार या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्या मिळणार असल्याने उमेदारवांसह कार्यकर्ते आजची रात्र मात्र जागून काढणार अशेच चिन्ह सध्या दिसत आहेत. 

एवढ्या मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क  

नाशिक जिल्हा तीन तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत 58.74 टक्के मतदान झाले आहे. सध्या पावसाची संततधार सुरूच असल्याचे भर पावसातही नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. 88 ग्रामपंचायतींसाठी 284 मतदान केंद्र असून यामध्ये स्त्री मतदार 69 हजार 942 तर पुरुष मतदार 75 हजार 144 व इतर मतदार 1 असे 1 लाख 45 हजार 87 एकूण मतदार संख्या आहे. दरम्यान 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अद्याप अधिकृत आकडेवारी येणे बाकी आहे. 

या ग्रामपंचायतीत मतदान 

नाशिक तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीत मतदान प्रक्रिया पार पडली असून जवळपास 81.96 टक्के मतदान झाले आहे. तर येथील 16 ग्रामपंचायतीमधून जवळपास 54 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर 1 उमेदवार सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आला आहे. तर दिंडोरी तालुक्यात 50 ग्रामपंचायतीमधून जवळपास 173 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर 5 उमेदवार सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आले आहे. तर कळवण तालुक्यात 22 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये  जवळपास 107 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर 03 उमेदवार सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Embed widget