एक्स्प्लोर
लग्न मोडल्याने नैराश्य, नाशिकमध्ये इंजिनीअर तरुणाची आत्महत्या
भरत ठोंबरे असं विद्यार्थ्याचं नाव असून तो पुण्यात शिक्षण घेत होता.
नाशिक : लग्न मोडल्याच्या नैराश्यातून एका 24 वर्षीय इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. नाशिकमधील ही घटना आहे. भरत ठोंबरे असं विद्यार्थ्याचं नाव असून तो पुण्यात शिक्षण घेत होता.
भरत ठोंबरे सुट्टीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या सातपूर परिसरातील सावरकर नगरमध्ये त्याच्या मित्राकडे वास्तव्यास होता. शुक्रवारी (काल) सकाळी त्याचा मित्र नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला आणि संध्याकाळी तो घरी परत आला असता भरतने खिडकीच्या गजाला नायलॉन मांजाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं.
दरम्यान, आत्महत्येच्या कारणांचा पोलीस शोध घेत असतानाच त्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचं शनिवारी उघड झालं. भरतचं एका मुलीसोबत लग्न ठरलं होतं. मात्र, काही कारणास्तव मुलीने लग्नास नकार दिल्याने काही दिवसांपासून तो नैराश्य अवस्थेत होता.
आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित मुलीला त्याने मोबाईलवरुन मेसेजही केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. भरत ठोंबरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा रहिवासी असून त्याच्या अशा जाण्याने ठोबरे कुटुंबीयांसह मित्र परिवारावर शोककळ पसरली आहे.
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement