एक्स्प्लोर
दहा रुपयाच्या नाण्यावर बंदी नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!
नाशिक : नाशिकमध्ये 10 रुपयांच्या नाण्यावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून दहा रुपयाचं नाणं स्वीकारले जात नाही. विशेष म्हणजे बहुतेक ठिकाणी तसे सूचना फलकच लावण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, आता नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे की, दहा रुपयाच्या नाण्यावर बंदी नसून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालून अनेक दिवस उलटूनही त्याचा त्रास नागरिकांन सहन करावा लागतो आहे. आजही नाशिकमधील जवळपास 70 टक्के एटीएममध्ये पैसे शिल्लक नसल्याने अनेक नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतं.
एकंदरितच नोटाबंदीमुळे उद्भवलेली परिस्थिती कायम असताना आता एका नवीनच समस्येला नागरिकांना तोंड द्यावं लागतं आहे. नाशिकमध्ये दहा रुपयाच्या नाण्यावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे तसे फलकच अनेक ठिकाणी लावलेले पाहायला मिळत आहेत.
बँकांकडून दहा रुपयाचे नाणे स्वीकारले जात नसून आमच्याकडे 3 ते 4 लाख रूपयांची नाणी पडून आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हीही ग्राहकांकडून ही नाणी घेत नसल्याचं पेट्रोलपंप चालकांकडून सांगण्यात येत आहे.
नाशिकमध्ये दहा रुपयांची नाणी घेतली जात नसल्याचं पेट्रोलपंप हे एकच उदाहरण नसून शहरातील भाजी बाजार, छोटे मोठे व्यावसायिकही नाणी घेण्यास नकार देत असल्याचं बघायला मिळत आहे. ग्राहकच नाणी घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं व्यापाऱ्यांकडून उलट सांगण्यात येत आहे.
आरबीआयकडून फक्त जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा या चलनातून बाद करण्यात आल्या असून दहा रूपयांच्या नाण्यावर कुठलीही बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, काही दिवसांपासून सोशल मीडियावर खास करून व्हॉट्सअपवर ही नाणीही बंद झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. नाणी न स्वीकारणाऱ्यावर योग्य ती कारवाईही केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement