एक्स्प्लोर
नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांचा तब्बल 15 जणांना चावा

नाशिक: नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. कारण, काल एकाच दिवसात एका भटक्या कुत्र्यानं 15 लोकांना चावा घेतला. उत्तमनगर आणि राजरत्न नगर परिसरात ही घटना घडली. भटक्या कुत्र्यानं 7 लहान मुलांना अक्षरक्षः ओढत नेऊन चावा घेतला. ज्यात त्यांना गंभीर इजा झाली.
परिसरात घराच्या बाहेर लहान मुले खेळत असतांना भटक्या कुत्र्यानं त्यांना चावा घेतला. या घटनेनंतर जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा नाशिक महापालिकेनं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते आहे. याआधीही नाशिककरांनी वारंवार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मात्र, पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतो आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























