एक्स्प्लोर
Advertisement
तुकाराम मुंढेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करण्याचा निर्णय
नाशिकच्या एका वॉर्डात निवडणूक जाहीर झालेली असताना आयुक्तांनी हा निर्णय घेतला, ज्याचा प्रभाव मतदारांवर पडला, त्यामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक : करवाढीचा निर्णय घेतल्यामुळे नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात येणार आहे. नाशिकच्या एका वॉर्डात निवडणूक जाहीर झालेली असताना आयुक्तांनी हा निर्णय घेतला, ज्याचा प्रभाव मतदारांवर पडला, त्यामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंच न इंच जमिनीवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात रोष आहे. त्याची प्रचिती महासभेत आली. तब्बल साडेदहा तास महासभेत चर्चा झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी लादलेल्या करवाढीला स्थगिती देण्यात आली.
नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक 13 च्या पोट निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. त्यातच तुकाराम मुंढे यांनी करवाढीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रभाग 13 मधील 50 हजार मतदारांवर त्याचा प्रभाव पडल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला.
आयुक्तांनी स्वतः आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरुन महापौरांनी आयुक्तांविरोधात तक्रार करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. तसंच आयुक्तांना जर करवाढ करायाची असेल, तर त्यांनी नियमानुसार स्थायी समितीवर सदर प्रस्ताव सादर करावा आणि त्यानंतर महासभेच्या पटलावर ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातमी :
घरपट्टीत वाढ, तुकाराम मुंढेंविरोधात 'मी नाशिककर' मोहीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement