एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सुवर्ण'विजेत्या दत्तू भोकनळचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत
दत्तू भोकनळने सुवर्णपदक पटकावल्याची बातमी येताच, गावकरी, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांनी गावात जल्लोष केला होता. तो गावी कधी येतोय याची गावकरी वाट पाहात होते.
मालेगाव (नाशिक): कठीण प्रसंगातही नौकानयन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या दत्तू भोकनळचं आज त्याच्या गावी जंगी स्वागत केलं. दत्तू मालेगावातील तळेगावरोही इथं येताच गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. भारताच्या रोईंग चमूने 24 ऑगस्ट रोजी 18व्या एशियाड गेम्समधील पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. चार जणांच्या संघामध्ये महाराष्ट्रातील तळेगावरोहीच्या दत्तू भोकनळचा समावेश होता.
दत्तू भोकनळने सुवर्णपदक पटकावल्याची बातमी येताच, गावकरी, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांनी गावात जल्लोष केला होता. तो गावी कधी येतोय याची गावकरी वाट पाहात होते.
दत्तू दहा दिवसानंतर गावी आला आणि सर्व गावकरी अक्षरश: आनंदात न्हावून निघाले. गावकऱ्यांनी अगोदरच त्याच्या स्वागताची तयारी केली होती.
गावाच्या वेशीतील देवी मंदीरापासून भव्य मोटर सायकल रॅलीसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्याच्या शाळेत भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी खासदार,आमदार,शासकीय अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आई वडिलांचं देशात मोठं नाव व्हावं, हे आपलं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. आता ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळवायचं आहे. आता तेच ध्येय आहे, असं दत्तूने सांगितलं.
संबंधित बातम्या
Asian Games 2018 : पुरुषांच्या रोईंग कॉड्रापल स्कल्समध्ये सुवर्ण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement