Rohit Pawar : रोहित पवार बांधावर, कांद्यावर ट्रॅक्टर फिरवलेल्या निफाडच्या शेतकऱ्याची घेतली भेट
Rohit Pawar : निफाड तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या कांद्यात ट्रॅक्टर फिरवून जनावरं सोडली आहेत. त्या शेतकऱ्याची राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भेट घेतली
![Rohit Pawar : रोहित पवार बांधावर, कांद्यावर ट्रॅक्टर फिरवलेल्या निफाडच्या शेतकऱ्याची घेतली भेट Agriculture News Nashik NCP Mla Rohit Pawar met onion producer Farmer in Nashik Rohit Pawar : रोहित पवार बांधावर, कांद्यावर ट्रॅक्टर फिरवलेल्या निफाडच्या शेतकऱ्याची घेतली भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/c10bc0d3eef6093104b77b0b884c20b41677393630050339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Pawar : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी ( Onion Farmers) चिंतेत आहे. कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळं नाशिकमधील (Nashik) नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात ट्रॅक्टर फिरवून जनावरं सोडली आहेत. या शेतकऱ्याची कर्जतचे जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी भेट घेऊन चर्चा केली.
सरकराच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका
दरवर्षी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील कसमादे परिसरात सर्वात जास्त कांदा उत्पादन घेतलं जातं. मात्र, मागील 8 वर्षांपासून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं उत्पादकांना खर्च वजा करुन नफा मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
दर नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी काढले कांदे
कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकरी आपल्या शेतातील कांद्याचे पीकच काढून टाकत आहेत. कारण कांद्याला मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणं शक्य होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागापुर येथील शेतकरी सुभाष निंबोरे यांनी देखील एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे. तसेच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय. धनंजय थोरात यांनी या कांदा पिकासाठी आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये खर्च केला होता. मात्र, कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे भाव कोसळले. खर्चही निघणार नसल्यानं हवालदिल झालेल्या थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. तसेच कोणीही या, मोफत कांदा उपटून घेऊन जा आणि रान मोकळे करून द्या अशी म्हणण्याची नामुष्की या शेतकऱ्यावर ओढवली आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त कांद्याचं उत्पादन
देशात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होतं. इथूनच इतर राज्यांना कांद्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यंदा महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले आहेत. कांद्याला रास्त भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. कांद्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांशी सौदेबाजी करत आहेत. असं असतानाही कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Onion Price : शेतकऱ्याची थट्टा! 825 किलो कांदा विकला, पण पदरचाच एक रुपया द्यावा लागला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)