एक्स्प्लोर
नाशिकमध्ये मनोरुग्णाचा हल्ला, कुऱ्हाडीने वार करुन तिघांना संपवलं
नांदगाव तालुक्यातील हिंगण देहरे गावात मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीने आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास लोकांवर कुऱ्हाडीने वार केले.
नाशिक : मानसिक रुग्णाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
नांदगाव तालुक्यातील हिंगण देहरे गावात मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीने आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास लोकांवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला तर 5 ते 6 जण जखमी आहेत. जखमींना नांदगाव इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तीन जणांची हत्या करणारा मनोरुग्ण काहीच दिवसांपूर्वी गावात परतला होता. आज सकाळी तो कुऱ्हाड घेऊन घराबाहेर पडला. सर्वात आधी स्वतःच्या आजोबांवर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर त्यानं रस्त्यावरुन जाणाऱ्या मोटरसायकलस्वाराला सावज केलं. मात्र तेवढ्यावरच तो थांबला नाही. गावाच्या बंधाऱ्यावर जाऊन त्यानं आणखी एकाची हत्या केली आणि तो मंदिरात जाऊन बसला.
त्यानंतर सावध झालेल्या गावकऱ्यांनी मनोरुग्णाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. बुवाबाजीच्या नादाला लागल्यामुळे आरोपी मानसिक रुग्ण झाल्याचं समजतं.
या गावात यापूर्वीही अशी घटना झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु आजच्या प्रकारामुळे हिंगण देहरे गावात दहशत पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement