एक्स्प्लोर

त्र्यंबक नगरीत भरला वारकऱ्यांचा मेळा; पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा, निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक

Nashik Trimbakeshwar News: आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून यात्रेनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या चरणी लाखो वारकरी नतमस्तक झाले.

Nashik Trimbakeshwar News: सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, धन्य धन्य निवृत्ती देवा... समाधी त्र्यंबक शिखरी.... मागे शोभे ब्रह्मगिरी...असा महिमा वर्णावा किती' मोठ्या भक्तीभावात आज त्र्यंबक नगरी (Trimbakeshwar News) नाहून निघाली. यावेळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा (Saint Nivruttinath Maharaj Yatra) महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा आज, पहाटे राज्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सपत्नीक केली. तर औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurngabad District) वैजापूर तालुक्यातील सूर्यवंशी दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला. 

दोन वर्षे कोरोनाच्या व्यत्ययानंतर यंदा मोठ्या उत्साहात संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव साजरा होत आहे. आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून यात्रेनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी लाखो वारकरी  नतमस्तक झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्यांनी दुमदुमलेला परिसर आज भाविकांच्या गर्दीने अधिकच फुलून गेला होता. गळ्यात तुळशी माळा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेतलेल्या लाखो वारकऱ्यांनी त्र्यंबकनगरी गजबजून गेली आहे. 

नाशिकच्या अंजनेरी ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबक नगरीत ज्योतिर्लिंगाच्या सान्निध्यात व गोदातिरी मोठ्या भक्तीभावात ही यात्रा संपन्न होत आहे. दरम्यान दोन दिवसांपासून मोठी गर्दी ही त्र्यंबकेश्वर नगरीत पाहायला मिळत असून दर्शन बारीत लांबच लांब रांगा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी लागल्या आहेत. त्याचबरोबर आज पहाटेपासूनच वारीत वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसह कुशावर्तात स्नानासाठी भाविक गर्दी करीत असून केवळ डुबकी मारुन पवित्र होण्यासाठी भाविक विशेषकरुन महिलावर्गाचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे.

निर्मल दिंडी पुरस्कार

यंदा निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येणार आहे. जवळपास पाचशेहून अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वर शहरात दाखल होत असून या पार्श्वभूमीवर निर्मलवारी करण्याचा निश्चय आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिंड्यासाठी महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. आपण थांबत असलेल्या ठिकाणी योग्य स्वच्छतेचे नियोजन केल्यास निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे दिंडी उपयोगी साहित्य देण्यात येणार असून स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. 

ऑनलाईन दर्शन सुविधा ... 

दरम्यान ज्या वारकऱ्यांना दिंडीत येणं शक्य होणार नाही त्या भाविकांसह इतर राज्यातील भाविक भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जवळपास त्र्यंबक प्रशासनाकडून 32 सीसीटीव्ही कॅमेरे आणि देवस्थानकडून दहा ते पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे तैनात ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर मंदिर परिसरात, मंदिराच्या आतील बाजूस मंदिर प्रशासन, बाहेरील बाजूस स्थानिक प्रशासनाकडून सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनाऊसिंग व्यवस्था उपलब्ध करुन दिला जाणार आहे. याबाबतची माहिती त्र्यंबक पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget