Sudhir Mungantiwar : "आंबेडकर कुणाचेचं नाहीत, त्यांना काँग्रेसही घ्यायला तयार नाही"; सुधीर मुनगंटीवारांचा टोला
Nashik News : प्रकाश आंबेडकर कुणाचेच नाही, काँग्रेसचेही लोक त्यांनी सोबत घ्यायला तयार नाही. आंबेडकरांची भूमिका ते स्वतःच मांडतील, असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
Sudhir Mungantiwar नाशिक : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) कुणाचेच नाही, काँग्रेसचे (Congress) ही लोक त्यांनी सोबत घेत नाही. आंबेडकरांची भूमिका ते स्वतःच मांडतील, असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी लगावला आहे.
आज सोमवारी सुधीर मुनगंटीवार नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, व्यक्तिगत लढण्यासाठी कोणतेही बंधन नाही. पण एक संयम असणे आवश्यक आहे. चुकीचा शब्द जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. काही वेळेला परसेप्शन जिंकते. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे सांगितले जात असेल तर वातावरण दूषित होणार नाही याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकमध्ये केले.
कारण नसताना तणाव होतोय
छगन भुजबळांच्या भूमिकेबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ओबीसींसाठी न्याय मागण्यासाठी तेच सांगत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू हेच ते सांगत आहे. आरक्षण देण्यात कुणाचं दुमत नाही. कारण नसताना तणाव होतोय असे माझे मत आहे. भुजबळ साहेबांनी हेच सांगितले आहे की, कुणबी असेल तर आरक्षण द्यायला काहीच अडचण नाही. शरद पवार साहेबांनी मागे सांगितले होते की, एका हाताला लकवा मारलाय. भुजबळ साहेब वातावरण दूषित करत नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.
परसेप्शन विरुध्द रियालिटी होऊ नये इतकीच अपेक्षा
आपल्या देशात झुंडशाहीने कायदे बदलत नाही हे वाक्य बरोबर आहे. पण जरांगे यांच्या मोर्चाबाबत बोलले तर योग्य नाही. ओबीसी आणि मराठे सगळ्यांचे आम्ही मेळावे घेतले. मेळावे घेतले तर भांडण लागत नाही. भुजबळ साहेबांना भीती वाटत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. कॅबिनेटमधील माहिती अशी आहे की, सरसकट द्यायच्या मुद्दावर प्रश्न उपस्थित केला आहे. परसेप्शन विरुध्द रियालिटी होऊ नये इतकीच अपेक्षा आहे. कायद्याला कुणीच बदलू शकत नाही.
एक भाऊ, आई आणि बहीण एकत्र राहिले तरी इंडिया आघाडी टिकेल
प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत सुधीर मुनगंटीवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आंबेडकर कुणाचेच नाही, काँग्रेसचे ही लोक त्यांनी सोबत घेत नाही. आंबेडकरांची भूमिका ते स्वतःच मांडतील. 'तुकडे हुये हजार' अशी इंडिया आघाडीची अवस्था झाली आहे. एक भाऊ, आई आणि बहीण एकत्र राहिले तरी इंडिया आघाडी टिकेल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
ते राजकारणात येत असतील तर चांगली गोष्ट
शांतीगिरी महाराजांनी सोमवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी घोषणा केली. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ते राजकारणात येत असतील तर चांगली गोष्ट आहे. महाराजांनी राजकारणात यावे आणि राजकारण्यांनी महाराज होऊ नये, इतकीच अपेक्षा, असे ते म्हणाले.
नदीचे शोषण होऊ नये म्हणूनच गोदा आरती
गंगा आरतीबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, काही साधू माझ्याकडे आले होते. मी त्या खात्याचा मंत्री नसलो तरी पैसे द्यायला तयार झालो. मुख्यमंत्री आधात्मिक आहेत. त्यांच्या कपाळावर कायम टिळा असतो. देवेंद्र फडणवीस कधी विरोध करत नाही. गोदा आरतीच्या निधीचे नियोजन व्हावे, गंगा आरती प्रसिद्ध व्हावी, सर्वांचे म्हणणे ऐकले जावे, विरोध संकल्पनेला नाही, अधिकार अबाधित राहावा यासाठी पुरोहित संघाचे म्हणणे आहे. नदी आमची माता, तिचे शोषण होऊ नये यासाठी ती आरती असल्याचे यावेळी मुनगंटीवार म्हणाले.
आणखी वाचा