एक्स्प्लोर

Shantigiri Maharaj : "रामराज्य आणण्यासाठी निवडणूक लढविणार"; शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Nashik News : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. रामराज्य आणण्यासाठी निवडणूक लढविणार, असे त्यांनी म्हटले आहे.

Shantigiri Maharaj नाशिक : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहू लागलेत. राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरू असतानाच प्रत्येक जागेवर दावेदारी वाढत आहेत. यात साधू संत देखील मागे नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

राम मंदिर लोकार्पण (Ram Mandir Inauguration) सोहळ्यानंतर देशभरात हिंदुत्ववाची लाट निर्माण करण्याचा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत ती टिकून ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. त्यामुळे विद्यमान खासदारांसह महायुतीच्या घटक पक्षातील इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

शांतीगिरी महाराज लोकसभेची निवडणूक लढवणार

या लाटेत स्वार होण्यासाठी साधू संतही सरसावले असून जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी असणारे शांतीगिरी महाराज यांनीही दंड थोपटले आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली आहे. शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांचा लाखोंचा भक्त परिवार आहे. देशभरात त्यांचे 115 आश्रम असून 7 गुरुकुलाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण दिले जात आहे. 

यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघावर लक्ष

शांतीगिरी महाराजांना निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे. या आधी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून शांतीगिरी महाराजांनी निवडणूक लढवीत तिसऱ्या क्रमांकची मत मिळवली होती. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे झालेल्या मत विभाजनाचा शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना चांगलाच फटका बसला होता. खैरेंच्या विजयाचा फरक अवघ्या 32 हजार मतांवर होता. त्याच अनुभवाची शिदोरी,  जय बाबाजी भक्त परिवाराच्या आग्रहामुळे शांतीगिरी महाराज पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत. मात्र यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघावर त्यांचे लक्ष आहे.

रामराज्य आणण्यासाठी निवडणूक लढविणार - शांतीगिरी महाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारीला नाशिकमध्ये रोड शो करत नाशिकचे राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेसाठी जो तो प्रयत्न करतोय. नाशिक ही संतांची भूमी असल्याने या भूमीतून रामराज्य आणण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचा दावा शांतीगिरी महाराज यांनी केला आहे. 2009 लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना 2 लाख 55 हजार 786 मत मिळाली होती तर काँगेसच्या उमेदवाराला 2 लाख 22 हजार 883 मते मिळाली होती तर 1 लाख 48 हजार 26 मतांवर शांतीगिरी महाराजांना समाधान मानावे लागले होते.

कुठल्या पक्षातून लढणार हे अद्याप स्पष्ट नाही

दरम्यान, शांतीगिरी महाराज यांनी अद्याप कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीची चाचपणी करून आपली उमेदवारी अपक्ष असणार की राजकीय पक्षाकडून असणार हे ते स्पष्ट करणार आहेत. मात्र शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीच्या घोषणेने राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या पोटात गोळा आलाय हे नक्की. 

कोण आहेत शांतीगिरी महाराज?

शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे. भजन, प्रवचन, अनुष्ठान, सत्संगच्या माध्यमातून धार्मिक कार्यात पुढाकार ते घेतात. देशभरात त्यांचे 115 आश्रम आहेत, 7 गुरुकुल देखील ते चालवितात. अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांची मौनीगिरी महाराज अशीही ओळख आहे. या आधी त्यांनी तब्बल 12 वर्ष मौन पाळले होते. आताही अनुष्ठान काळात ते मौन धारण करतात. 

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal : "मी एकटा नाही, माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव"; छगन भुजबळांचे वक्तव्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget