Sanjay Raut : "राम मंदिर होणं अस्मितेचा प्रश्न, शिवसेनेच्या संघर्षाची नोंद इतिहासाच्या पानापानात; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut in Nashik : राम मंदिर होणं, उभे राहणे आणि लोकांसाठी खुले होणं हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि होता, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केले.
Sanjay Raut नाशिक : राम मंदिर होणं, उभे राहणे आणि लोकांसाठी खुले होणं हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि होता. मंदिर व्हावं यासाठी शिवसेनेने केलेला त्याग आणि संघर्ष केल्याची नोंद इतिहासाच्या पानापानात आहे, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केले.
उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाहीर केल्याप्रमाणे २२ आणि २३ जानेवारी रोजी शिवसेनेचा राजकीय तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक असे दोन सोहळे होणार आहे. २२ तारखेला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमच्या शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले आहे.
राममंदिराशी भावनिक नातं कायम
राम मंदिर होणं, उभे राहणे आणि लोकांसाठी खुले होणं हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि होता. मंदिर व्हावं यासाठी शिवसेनेने केलेला त्याग आणि संघर्ष केल्याची नोंद इतिहासाच्या पानापानात आहे. राम मंदिरासाठी हजारो शिवसैनिक कार सेवक म्हणून गेले, त्या संघर्षात त्यांना अटक झाल्या. आमचे अनेक आमदार, खासदार आणि शिवसैनिकांना बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करावा लागला. राममंदिराशी आमचे भावनिक नाते कायम आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
प्रभू श्रीरामाचा करणार जागर
ते पुढे म्हणाले की, आम्ही २२ तारखेला प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पंचवटीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सायंकाळी ६ वाजता काळाराम मंदिरात आम्ही सगळे दर्शन घेऊ, धार्मिक विधी होतील. गोदावरीकाठी आरती केली जाईल. २३ तारखेला हॉटेल डेमोक्रसी येथे राज्यव्यापी शिबिर होईल. संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेनेचा प्रचाराचा नारळ वाढवला जाईल.२२ आणि २३ तारखेला आम्ही प्रभू श्रीरामचंद्र यांचा जागर करणार आहोत.
जरांगे उत्तर द्यायला समर्थ
मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात टीकास्त्र सुरु आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, दादा आणि जरांगे पाटील पाहून घेतील. जरांगे उत्तर द्यायला समर्थ आहेत, असे ते म्हणाले.
2024 नंतर त्यांना दुसरं काम काय?
मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी 3 डिसेंबरपासून शहरात ‘संपूर्ण स्वच्छता’ मोहीम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू आहे.मुख्यमंत्री शिंदे हे स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. यावर राऊत यांना विचारले असता 2024 नंतर त्यांना दुसरं काम काय आहे? असा टोला त्यांनी लगावला आहे.
नितेश राणेंवर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ
हिंदू जन आक्रोश मोर्चाप्रसंगी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपचे आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजपचे वादग्रस्त आमदार टी. राजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर पत्रकारांनी संजय राऊत यांनी विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.
आणखी वाचा