एक्स्प्लोर

नाशकात 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप, आता शिवसेनेकडून राऊतांना जशास तसं उत्तर!

Sanjay Raut : नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मर्जीतले बिल्डर 800 कोटींचे लाभार्थी आहेत, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Shiv Sena on Sanjay Raut : येथे 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्या मर्जीतले बिल्डर 800 कोटींचे लाभार्थी आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यावर आता शिवसेनेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. 

आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाशिकच्या महानगरपालिकेच्या नगरविकास विभागाकडून भूसंपादनाचा प्रकरणात 800 घोटाळे केल्याच्या संजय राऊतांच्या आरोपावर शिवसेनेकडून (Shiv Sena) खुलासा करण्यात आला आहे. 

राऊत-बडगुजरांनी संगनमताने नाशिक मनपात घोटाळा केला

ठाकरे गटाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) व खासदार संजय राऊत यांनी संगनमताने नाशिक महानगरपालिकेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी केला आहे. तर पालिका प्रशासनाने भूसंपादन करणाऱ्या जमिनीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. प्रस्ताव तयार करणे व मंजूर करण्यासाठी समिती होती. सर्व निर्णय समितीनुसार झाले आहेत. आम्ही भ्रष्ट्राचार केला तर मग तेव्हा आमची चौकशी का केली नाही? संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे भाजप नेते गणेश गीते (Ganesh Gite) यांनी म्हटले आहे.  

संजय राऊतांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र 

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना नाशिक महापालिकेत झालेल्या 800 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी पत्र पाठवले आहे. तसेच हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले आहे. विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नाशिक महापालिकेमार्फत खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचे अर्थात जमिनी ताब्यात घेऊन विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात नाशिक शहरातील ठराविक बिल्डरांचे आर्थिक हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनाच सातशे कोटी रुपये जमिनींचा मोबदला म्हणून वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आला. यामुळेच मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी टाळून संबंधित बिल्डरांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे. 

नाशिक मनपाच्या तिजोरीची लूट

नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली मुख्यमंत्री असताना केली. तेव्हा लोकांना वाटलं नाशिकचा विकास होईल, भरभराट होईल, पण पाच वर्षांच्या सत्ता काळात नाशिक शहराचा विकास होण्याऐवजी नाशिक महानगरपालिकेच्या तिजोरीची पूर्णपणे लूट केली, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. 

आणखी वाचा 

Sanjay Raut: चक्की पिसिंग म्हणणाऱ्यांचं किसिंग करताय, त्यांच्या मांडीला मांडी लावताय, राऊतांचे एक दगडात दोन निशाणे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Embed widget