Shiv Sena on Nashik Tree Cutting: तपोवन वृक्षतोडविरोधातील आंदोलनाची धग आणखी वाढणार; सत्ताधारी अजित पवारांपाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेने शड्डू ठोकला!
Shiv Sena on Nashik Tree Cutting: सत्ताधारी पक्षातील अजित पवार तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शवलाय. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.

Shiv Sena on Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) तयारीला जोरदार सुरुवात झाली असली, तरी तपोवन (Tapovan) परिसरातील प्रस्तावित साधूग्राम (Sadhugram) प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड (Tree Cutting) होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना तसेच अनेक सेलिब्रिटींनी जोरदार विरोध केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde), शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.
Shiv Sena on Nashik Tree Cutting: अजित पवारांपाठोपाठ शिंदेंची शिवसेनाही मैदानात
या प्रकरणावर सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील स्पष्टपणे वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता. आता यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (Shiv Sena) या विषयावर आक्रमक भूमिका घेत आंदोलनात उतरणार आहे. तपोवनातील वृक्ष तोडी विरोधात आज शिंदेंची शिवसेना आंदोलन करणार आहे. दुपारी साडेचार वाजता हे आंदोलन होणार आहे. विरोधी पक्षांसह आता सत्ताधारी पक्ष देखील तपोवनातील वृक्षतोड रोखण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे हा मुद्दा अधिकच गंभीर बनला आहे.
Ajit Pawar on Nashik Tree Cutting: काय म्हणाले होते अजित पवार?
तपोवन वृक्षतोडीविरोधात अजित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले होते की, तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.
MNS on Nashik Tree Cutting: तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसेचं उद्या आंदोलन
नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्राम प्रकल्पासाठी सुरू असलेल्या 1800 झाडांच्या तोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींचा आवाज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मनसेच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करणार आहे. शनिवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता तपोवनातील कमानीजवळ संभाजीनगर रोडवर निषेध आंदोलन होणार आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह शालिनी ठाकरे आणि शशांक नागवेकर उपस्थित राहणार आहेत. मनसेने वृक्षप्रेमींना देखील सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा























