(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Birthday: 'साहेबांना शुभेच्छा देताना संकोच वाटला', अजित पवार गटातील नेत्याची खंत
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास देविदास पिंगळे यांचाही समावेश होता. अजित पवार गटात गेलेलं एकही पदाधिकारी कार्यकर्त्या आला नसताना पिंगळे यांनी हजेरी लावली होती.
नाशिक : शरद पवार हे वाढदिवसाला (Sharad Pawar Birthday) नाशिकमध्येच (Nashik News) असल्याने काल रात्रीपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता. अजित पवार गटात (Ajit Pawar) गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार देविदास पिंगळे यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार गटात गेलेल्या एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आला नसताना पिंगळे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. आज साहेबांना शुभेच्छा देताना संकोच वाटल्याची प्रामाणिक कबुली त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसंच यापुढे अजितदादांसोबतच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
वाढदिवसाच्या दिवशी पवार नाशिकमध्येच असल्यानं काल रात्रीपासूनच शरद पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव सुरू होता. सकाळपासून ही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या गर्दीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास देविदास पिंगळे यांचाही समावेश होता. अजित पवार गटात गेलेलं एकही पदाधिकारी कार्यकर्त्या आला नसताना पिंगळे यांनी हजेरी लावली होती.
नाशिकच्या दौऱ्यात गोकुळ पिंगळेंच्या घरी भेट
अजित पवार गटात गेलेले माजी खासदार देविदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे हे शरद पवार गटात आहे. सध्या शरद पवार गटात असलेले गोकुळ पिंगळे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नाशिकमध्ये चाचपणी केली. अजित पवार गटात जिल्हातील सर्व सर्व आमदार गेल्यानं शरद पवारांनी स्वत: चाचपणी केली . एवढच नाही तर चाचपणीनंतर शरद पवारांनी नाशिक लोकसभेवर देखील दावा ठोकला आहे. नाशिकच्या दौऱ्यात गोकुळ पिंगळेंच्या घरी भेट देत त्यांच्याशी खासगीत चर्चा केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे पवारांकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याचे चित्र आहे.
शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 83 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने नाशिकमध्ये शरद पवार यांना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांनी आणलेला केक शरद पवारांनी कापला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली आहे. या निमित्ताने राज्यातील अनेक शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विविध पद्धतीने वाढदिवस साजरा करत आहेत. नाशिकच्या दौऱ्यानंतर शरद पवार नगपुरला पोहचले आहे. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपीय सभेसासाठी शरद पवार नागपूरला आहेत.