एक्स्प्लोर

Shantigiri Maharaj : लाखोंचा भक्त परिवार, PM मोदींसारखेच केले अनुष्ठान, शांतीगिरी महाराज नेमकी का लढतायेत नाशिक लोकसभेची निवडणूक?

Nashik Lok Sabha Constituency : शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज मोठं शक्तीप्रदर्शन करत शांतीगिरी महराज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभर चर्चेत आला आहे. कारण महायुतीत (Mahayuti) नाशिकच्या जागेवरून अनेक दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. मात्र अजूनही महायुतीत नाशिकच्या जागेसाठी उमेदवार ठरलेला नाही. दररोज नवनवीन इच्छुकांची नावे समोर येत आहेत. महायुतीतून शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) देखील नाशिक लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. 

शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेचे महायुतीतून तिकीट मिळण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. मात्र त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर त्यांनी महाविकास आघडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांशीदेखील चर्चा केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शांतीगिरी महाराजांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र शांतीगिरी महाराजांना नेमकी नाशिकची निवडणूक का लढवायची आहे? हे जाणून घेऊयात...

शांतीगिरी महाराजांचा लाखोंचा भक्त परिवार

शांतीगिरी महाराज यांचा लाखोंचा भक्त परिवार असून देशात त्यांचे सुमारे 115 आश्रम आहेत. तसेच हजारो विद्यार्थ्यांना शांतीगिरी महाराजांच्या माध्यमातून सात गुरुकुलात धार्मिक शिक्षण देण्याचे कार्य केले जाते. अनुष्ठानाच्या माध्यमातून शांतीगिरी महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी मोठं कार्य केलंय. त्यांना मौनीगिरी महाराज म्हणून देखील ओळखले जाते. शांतीगिरी महाराजांनी या आधी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवली होती. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना चांगलाच फटका बसल्याचे दिसून आले होते. शांतिगिरी महाराजांचा या निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला होता. खैरेंच्या विजयाचा फरक अवघ्या 32 हजार मतांवर होता. 

शांतीगिरी महाराज नेमकी का लढताहेत नाशिकची निवडणूक? 

या निवडणुकीच्या अनुभवाची शिदोरी आणि जय बाबाजी भक्त परिवाराच्या आग्रहामुळे शांतीगिरी महाराज हे पुन्हा एकदा नाशिकची लोकसभा लढवत आहेत. शांतीगिरी महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करताच  नाशिक ही संतांची भूमी आहे. या भूमीतून रामराज्य आणण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार शांतीगिरी महाराजांकडून जोरदार तयारी केली जात आहे. 

शांतीगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींसारखेच केले अनुष्ठान

शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर तब्बल आठ दिवसांचे अनुष्ठान केले.  यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केदारनाथला अनुष्ठान करत निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली होती. शांतीगिरी महाराजांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणेच अनुष्ठान करत निवडणुकीसाठी दंड थोपटले. आज ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. नाशिकमध्ये आपल्या भक्तपरिवारासह  शांतीगिरी महाराजांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. शांतिगिरी महाराज यांच्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीला तगडे आव्हान निर्माण झाले आहे. नाशिकच्या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.   

आणखी वाचा 

Shantigiri Maharaj : सफारी, SUV सह 9 गाड्यांचा ताफा, 53 ठिकाणी जमीन आणि कोट्यवधींची संपत्ती; आजन्म ब्रह्मचारी असलेल्या शांतीगिरी महाराजांची संपत्ती किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget