एक्स्प्लोर

Rahul Gandhi : ...तर आम्ही गरिबांचे कर्ज माफ करणार; राहुल गांधींचे मालेगावातून आश्वासन

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकच्या मालेगावात धडकली आहे. मालेगावात जाहीर सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

Rahul Gandhi मालेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज सकाळी धुळे शहरात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यानंतर राहुल गांधी हे मालेगाव (Malegaon) शहरात दाखल झाले. मालेगावमध्ये त्यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. रोड शो नंतर त्यांनी जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, सर्वांना रमजान मुबारक. कन्याकुमारीपासून सुरु झालेली यात्रा आता मालेगावपर्यंत आली आहे. आरएसएस आणि कट्टरपंथी लोक धर्माधर्मात आणि आपापसात भांडणं लावत आहेत. मात्र हे टीव्हीवर दिसत नाही. मोदी टीव्ही वर दिसतात, पाण्यात दिसतात, नरेंद्र मोदी यांना एकसोबत सगळी नाचवायचं आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 

...तर आम्ही गरिबांचे कर्ज माफ करणार

ते पुढे म्हणाले की, आरएसएस भावा-भावात आणि राज्या-राज्यात भांडणं लावत आहेत. म्हणून नफरतच्या बाजारात मोहब्बतच दुकान खोललं आहे. गरीब महिलांसाठी आम्ही बँक खात्यात १ लाख रुपये वर्षाला देणार आहोत. ⁠नरेंद्र मोदी जर करोडपतींचे कर्ज माफ करणार असेल तर आम्ही गरिबांचे करणार आहोत, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. 

काँग्रेसकडून महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा 

मोदींनी मोठ्या धूम धडाक्यात महिला आरक्षण दिले. फटाके फोडले नाचले आणि सांगितले गेले की, सर्वे पूर्ण झाल्यावर तुम्हाला आरक्षण देणार असे म्हणण्यात आले. काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेच आरक्षण देणार. कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. सगळ्या गरीब महिलांना सरळ बँक अकाऊंटमध्ये एक लाख रुपये देणार. सरकारी नोकरीमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार. आशा अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांना केंद्र सरकारची भागीदारी दुप्पट करणार. सावित्री बाई फुले यांच्या नावाने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात हे हॉस्टेल उघडण्यात येणार आहे, अशा घोषणा काँग्रेसकडून धुळे येथे झालेल्या महिला मेळाव्यात करण्यात आल्या. 

राहुल गांधींचा मोदी सरकारवर आरोप 

देशात 22 असे लोक आहेत. ज्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे तितकीच 70 कोटी लोकांकडे आहे. 24 वर्षासाठी मनरेगासाठी जितकं बजेट लागते. तितकीच कर्ज माफी मोदी सरकारने 16 लाख करोड रुपये 22 उद्योगपतींना दिले आहे, अशी आरोप त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केली आहे. 

आणखी वाचा  

Nashik Lok Sabha 2024 : हेमंत गोडसेंना उमेदवारी, शांतीगिरी महाराजांची नाराजी, श्रीकांत शिंदेंच्या घोषणेवर महायुतीतून आक्षेप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025 7 PmSatish Bhosale Khokya News | सहा दिवस खोक्या होता कुठे? खोक्याला बेड्या कश्या ठोकल्या? ते खोक्याच्या घरावरील कारवाई; संपूर्ण व्हिडीओTop 100 News : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : Maharashtra News : 7 PmLadki Bahin Yojana  News | लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांना फटका, अर्थमंत्री अजित पवारांवर इतर विभागांची नाराजी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Embed widget