एक्स्प्लोर

Onion Export : अखेर कांदा निर्यात खुली, लासलगावात कालपेक्षा आजच्या दरात वाढ, जाणून घ्या कांद्याला किती मिळतोय भाव?

Onion Export : केंद्राने कांद्यावरील निर्यातबंद हटवली आहे. यामुळे सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात काल (दि. ०३) पेक्षा आजच्या सरासरी दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Onion Export : ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) काळात केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने कांद्यावरील निर्यातबंद हटवली (Onion Export) आहे. तसेच 550 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य (Export Duty) ठेवण्यात आले आहे. यामुळे कांद्याची निर्यात करणं शक्य होणार असून शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. 

दि. 7 डिसेंबर 2023 ला निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसला होता. त्यानंतर NCEL च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती. मात्र अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नवीन निर्णय घेतला असून याचे निर्यातदारांनी स्वागत केले आहे. 

या पार्श्वभूमीवर लासलगाव बाजार समितीत (lasalgaon Bajar Samiti) कांद्याला सरासरी 2 हजार 300 रुपये भाव मिळत आहे. तर जास्तीत जास्त 2 हजार 551 भाव मिळतोय. कालच्या आणि आजच्या दरात सरासरी 800 रुपये प्रति क्विंटल कांद्याचे भाव वाढल्याचे चित्र आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे नोटीफिकेशन निघाल्यानंतर कांद्याचा दरात सुधारणा झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. 

लासलगाव बाजार समितीतील शुक्रवारचे कांद्याचे दर 

कमीत कमी   - 700          
जास्तीत जास्त - 1 हजार 801       
सरासरी - 1 हजार 551

काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार? 

कांदा निर्यातबंदी हटवल्यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना म्हटले आहे की, आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती की, काहीही करा आणि कांदा निर्यात खुली करा. या निर्णयामुळे कांद्याला चांगला भाव मिळेल, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टता आहे की, किमान निर्यात मूल्य 550 प्रति मेट्रिक टन असेल. त्यामुळे आता कोणीही मनात संभ्रम बाळगू नये, निर्यात पूर्ण खुली झाली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, पण मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लागू, शेतकऱ्यांना फायदा होणार का? 

कोल्हापुरात लँडींगपूर्वीच मोदींचं शेतकऱ्यांना मोठ्ठं गिफ्ट; कांदा निर्बंध उठवले, 6 देशात निर्यातीला परवानगी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Clarification :  निवडणुकीच्या धामधुमीत पुस्तक बॉम्बMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Embed widget