एक्स्प्लोर

ना कुठला बडेजाव, ना कुठला भपका; निलेश लंकेंच्या साधेपणाने मनं जिंकली, दिव्यांग बांधवाच्या हस्ते भरला उमेदवारी अर्ज

NIlesh Lanke : निलेश लंके यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन न करता दिव्यांग बांधवाच्या हस्ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निलेश लंकेंच्या साधेपणाने सर्वांची मनं जिंकली.

Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपकडून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी देण्यात आली. काल सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र निलेश लंके यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

दिव्यांग बांधवाच्या हस्ते निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोठी रॅली न काढता साधेपणाने निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांनी सर्वांची मने जिंकली आहे. निलेश लंकेंचे मतदारसंघातून कौतुक केले जात आहे. 

हनुमानाने मला निवडणूक लढवण्याचे बळ द्यावे - निलेश लंके

निलेश लंके यांनी म्हटले आहे की, आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2024) असल्याने सर्वत्र हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहेत. तसेच कार्यकर्त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपण रॅली न काढता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हनुमानाने मला निवडणूक लढवण्याचे बळ द्यावे, अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी म्हटले आहे. 

विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय - राणी लंके

निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके (Rani Lanke) यांनी निलेश लंके विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. जनतेला सांगण्यासाठी विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यामुळे विरोधक आता खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. अहमदनगर येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा अर्ज भरण्याआधी झालेल्या जाहीर सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लंकेचे दहन करा, असे भाषणामध्ये बोलताना मतदारांना सांगितले होते. मात्र निलेश लंके हे निवडणुकीला उभे राहिले असल्यामुळे विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते आमच्यावर टीका करत असल्याचे राणी लंके यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सूजयला नगरच्या सर्व भागाची जाण आहे. या मतदारसंघाइल प्रश्न ते हिरीरीने मांडतात. मतदार हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारामागे उभा राहतात हा नगरचा इतिहास आहे. विरोधकांच्या लंकेचं दहन करायचे आहे. आता नो लंके ओन्ली विखे, ड्रामा करून खासदार होता येत नाही, असा निशाणा मुख्यमंत्र्यांनी निलेश लंकेंवर साधला होता. 

आणखी वाचा 

सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की, अहमदनगरचं नाव 'अहिल्यानगर' होणारच : देवेंद्र फडणवीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10  AM :14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10AM: 14 May 2024: ABP MajhaTOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
Embed widget