Ajit Pawar : वेदना आणि जितेंद्र आव्हाड हे कुठे काही जमते का? अजित पवारांचा टोला
Ajit Pawar On Jitendra Awhad : वेदना आणि जितेंद्र आव्हाड हे कुठे काही जमते का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष कोणाचा, निवडणूक चिन्ह कोणाचं, याबाबत निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर आज शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला. त्यांनी केलेल्या टीकेला अजित पवार (Ajit Pawar) यांनी टोला लगावला आहे. वेदना आणि जितेंद्र आव्हाड हे कुठे काही जमते का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. अजित पवार यांनी म्हटले की, यशवंतराव चव्हाण यांनी राष्ट्र हित, समाज हित बघितले. उभ्या महाराष्ट्रचे ते वंदनीय व्यक्तीमत्व आहे. कोणाला काय टीका करायची करू द्या. सुसंस्कृतपणा कसा असावा ही शिकवण दिली. माझा फोटो लावला तर कोर्टात जावे लागेल असे शरद पवार म्हणाले होते. फोटो लावला नाहीतर राज्यात फिरू शकणार नाही असे म्हटले. आता यशवंतराव चव्हाण आम्हाला असे म्हणणार नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले. कोर्टात तुमची केस असेल तर वकील बाजू मांडतात. आम्ही इकडे आहोत, निवडणूक आयोग समोर वकील बाजू मांडतात. वेदना आणि जितेंद्र आव्हाड हे कुठे तेही जमते का, असं म्हणत अजित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणी पवारांवर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत बचाव केला.
कुणी काय टीका करावी हा ज्याचा, त्याचा प्रश्न असल्याचे म्हणत रोहित पवारांच्या टीकेवर बोलणे टाळले. यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललोय. एक नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून काम करावे लागते. यशवंतराव चव्हाण साहेब वंदनीय व्यक्तिमत्त्व आहे. कमरे खालचे वार कधीच करायचे नाही, हे यशवंतरावच चव्हाण यांनी म्हटले होते, असेही अजित पवार यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटले होते?
निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत, शरद पवार हे हुकूमशाह पद्धतीने काम करत असल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. त्यावर आज, जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवार गटावर टीका केली. आव्हाड यांनी म्हटले की, कालपर्यंत ज्यांना विठ्ठल म्हणत होते आता हुकुमशहा कसं म्हणता? शरद पवार बोलून दाखवत नसतील पण तेही भावनिक झाले असतील. पक्ष स्थापन केल्यानंतर 18 लोकं मंत्री राहीले तेच म्हणतात पवारांनी लोकशीही ठेवली नाही. कालपर्यंत मी विश्वास ठेवायचो की या सगळ्यांचं (अजित पवार गट) दैवत पवार साहेबच आहे.. पण काल त्यांच्या वकीलाने पवारांना हुकुमशाह म्हटलं. हेच लोक पवरांना विठ्ठल म्हणत होते, दैवत म्हणत होते. महाराष्ट्रातील एका तरी व्यक्तीला हा आरोप मान्य होईल का प्रश्न आव्हाड यांनी केला. शरद पवार हे हुकूमशाह सारखे वागतात या वाक्यामुळे झालेलं दुःख व्यक्त करण्यासाठी मी हे भाष्य करत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. ज्या माणसाने आयुष्यभर लोकशाही मूल्यांचा आदर केला. राजीनामा दिल्यावर एक तास ही शासकीय घरात राहीले नाहीत असेही पवार यांनी म्हटले.