PM Narendra Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाशकात आगमन, शहर स्वागतासाठी सज्ज
Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. त्यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
PM Narendra Modi Nashik Visit नाशिक : नाशकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नुकतेच आगमन झाले आहे. थोड्याच वेळात नाशिकमध्ये नरेंद्र मोदींच्या भव्य रोड शो होणार आहे. नाशिककर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.
यावेळी राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन नाशिक विमान तळावर स्वागत केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे निलीगिरी बाग येथे स्वागत केले.
मोदींच्या हस्ते राष्टीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर (Maharashtra) सोपवण्यात आली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. या महोत्सवात 8 हजार युवक सहभागी होतील. उद्घाटन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वप्रथम नाशिकला भव्य रोड शो होणार आहे. या रोड शो ला एक ते दीड लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यानंतर मोदी रामकुंडावर जाणून जलपूजन करणार आहेत. त्यनंतर काळाराम मंदिरात जाणून दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.
मोदींच्या रोड शो साठी खास कार
नरेंद्र मोदींच्या नाशिक रोड शो साठी एक आलिशान गाडी सजवण्यात आली आहे. या गाडीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. याच वाहनातून पंतप्रधान मोदी हे रोड शो करतील. मोदी गाडीतून रोड शो करतील. त्यांच्या बाजूला त्यांची सुरक्षा व्यवस्था तैनात असेल. रोड शो सुमारे १.२ किमीचा असेल. मिरची सिग्नलपासून ते जनार्धन स्वामी मठापर्यंत रोड शो होणार आहे. यावेळी सुमारे १ ते दीड लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अत्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या