PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकला आज पर्वणी! मोदींचा रोड शो, राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम अन् बरंच कांही...
Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये करणार आहेत.
PM Narendra Modi Nashik Visit नाशिक : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर (Maharashtra) सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये (National Youth Festival in Nashik) होत असल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे. शुक्रवारी नाशिककर जणू पर्वणीचाच अनुभव घेणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते शुक्रवारी नाशिकच्या तपोवन येथील मोदी मैदानावर (Modi Maidan) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा रोड शो देखील होणार आहे. संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची (PM Narendra Modi Road Show in Nashik) आतुरतेने वाट पाहत आहेत.
असा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा
शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाशिकला आगमन होणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता त्यांचा नाशिकला रोड शो असणार आहे. त्यानंतर मोदी रामकुंडावर जाणून जलपूजन करणार आहेत. त्यनंतर काळाराम मंदिरात जाणून दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.
नाशिकला पंतप्रधानांचा रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा रोड शो नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची सर्कलपासून (Mirchi Circle Nashik) ते जनार्दन स्वामी मठ चौकापर्यंत (Janardhan Swami Math Nashik) होईल. महामार्गावरील एका बाजूने रोड शो तर दुसऱ्या बाजूने सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे एक ते दीड लाख लोक या रोड शोला उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुमारे १.२ किमीचे रोड शोचे अंतर असेल.
पंतप्रधान मोदी प्रभू रामाचे दर्शन घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर असून ऐतिहासिक काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. जवळपास 23 मिनिटं ते मंदिरात असणार असून विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. मोदी पूर्व महाद्वाराने मंदिरात प्रवेश करतील आणि प्रथम हनुमानाचे दर्शन घेतील. त्यानंतर प्रधान संकल्प केला जाईल, भावार्थ रामायणाचा पाठ केला जाईल आणि रामरक्षा पठण होईल, अशी माहिती महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे.
सभास्थळी चोख तपासणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभास्थळी नागरिकांची चोख तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. सभेच्या मैदानात कोणालाही काहीच नेता येणार नाही. पोलीस अंमलदारांकडून धातूशोधक यंत्रांसह कृत्रिमरित्या शारीरिक तपासणी होणार आहे. त्यानंतरच सभास्थळी प्रवेश दिला जाईल.
आणखी वाचा