एक्स्प्लोर

Nashik Teachers Constituency Election 2024 : शिक्षक मतदारांना भेटवस्तू अन् पैसे वाटप? आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर

Nashik Teachers Constituency Election 2024 : काही उमेदवारांकडून मतदारांना भेटवस्तू देऊन आमिष दाखविले जात असल्याच्या तक्रारीवरून आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आला आहे.

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज प्रचाराची सांगता होणार असून 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. नाशिकची निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाने पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. तर शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी महिला मतदारांना नथ आणि पुरुष मतदारांना कपडे वाटत असल्याचा दावा केला असून त्यांनी याबाबत निवडणूक आयोगात तक्रारही दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहे. 

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांना उमेदवारी दिली आहे. तर विवेक कोल्हे (Vivek Kolhe) हे अपक्ष निवडणूक लढवत आहे. नाशिकच्या चौरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर 

हेरंब कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आचारसंहिता कक्ष सतर्क झाले आहे. काही उमेदवारांकडून मतदारांना भेटवस्तू देऊन आमिष दाखविले जात असल्याच्या तक्रारीवरून आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आला आहे. आचारसंहिता कक्ष प्रमुखाचे शिक्षण उपसंचालक आणि नाशिक विभागातील जिल्हाधिकारी यांना तक्रारीचे पत्र पाठवण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील तक्रार असली तरी इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आचारसंहिताचा भंग झाल्यास कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

काय म्हणाले हेरंब कुलकर्णी?

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पुरुष शिक्षक असेल तर रेमंड कंपनीचे सफारीचे कापड आणि महिला शिक्षक असेल तर नथ दिली जात आहे. त्या भेट वस्तूंचे फोटो सोशल मीडियात फिरत आहेत. जळगाव जिल्ह्यात तर थेट शाळेवर जाऊन असे वाटप करण्याची हिंमत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी हेरंब कुलकर्णी यांनी केली होती.

जिल्हानिहाय मतदार संख्या

नंदुरबार :- 5 हजार 393

धुळे :- 8 हजार 159

जळगाव :- 13 हजार 122

अहमदनगर :-  17 हजार 392

नाशिक :- 25 हजार 302

एकूण मतदार :- 69 हजार 368

आणखी वाचा 

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराची आज सांगता, महायुती अन् मविआच्या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्यManda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabhaSharad pawar Baramati : युगेंद्र पवराांसाठी शरद पवारांची सभा, मंचावर जोरदार स्वागत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Embed widget