एक्स्प्लोर

नाशिकची रामरथ मिरवणूक बनली 'राजकीय आखाडा', लोकसभा निवडणुकीआधी हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे प्रभू श्रीराम चरणी लीन!

Nashik Ram Rathotsav : नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामरथ मिरवणुकीला सायंकाळी सहा वाजता सुरुवात झाली. या मिरवणुकीत राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून आली.

Nashik News : नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामरथ मिरवणुकीला (Nashik Ram Rathotsav) सायंकाळी सहा वाजता सुरुवात झाली असून यंदा भक्तांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. रथयात्रेत लोकसभेसाठी (Lok Sabha Election 2024) इच्छुक उमेदवारांसह हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला. 

या रथयात्रेमुळे पंचवटीतील रस्ते दिसेनासे झाले असून वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. श्रीराम व गरुड रथ काढण्याची 250 वर्षाची परंपरा आहे. काळाराम मंदिराच्या (Kalaram Mandir) पूर्व दरवाजापासून ढोल ताशांचा गजर, महाआरती आणि रामनामाचा जयघोष करत रामरथ आणि गरुड रथाची मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली होती.

हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे प्रभू श्रीराम चरणी लीन

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी रथावर जाऊन रामरायाचे दर्शन घेतले. एकीकडे खासदार हेमंत गोडसे हे महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या दोन्ही नेत्यांनी आज रथ यात्रेत सहभागी होत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. आजच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसेंच्या आशा पल्लवित झाल्या असून तिकीट मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  तसेच आगामी निवडणुकीत प्रभू श्रीराम कुणाला आशीर्वाद देणार? अशी चर्चा यावेळी नागरिकांमध्ये रंगली होती. 

रामाच्या भोगमूर्ती व पादुकांची सवाद्य मिरवणूक 

दरम्यान, रथयात्रा सुरु होण्यापूर्वी राममंदिरातून रामाच्या भोगमूर्ती व पादुकांची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. त्यानंतर रामाच्या रथात भोगमूर्ती तर गरुड रथात रामाच्या पादुका ठेवण्यात येऊन आरती केली जाते. रामरथ ओढण्याची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे तर गरुड रथाची जबाबदारी अहिल्याराम व्यायामशाळेकडे असते. 

मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांना कडेकोट बंदोबस्त 

रथयात्रा पुढे नागचौक, गणेशवाडीपासून गौरी पटांगणाकडे मार्गस्थ होते. या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून महिला भाविक रथाचे स्वागत करत मनोभावे दर्शन घेतात. रथोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा (Nashik Police) मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

आणखी वाचा 

सियावर रामचंद्र की जय! नाशिकमध्ये आज श्रीराम आणि गरुड रथ यात्रा, काय आहे शेकडो वर्षांची परंपरा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget