Nashik Accident : ब्रेक फेल झाल्याने एसटीची टँकरला जोरदार धडक, 20 हून अधिक प्रवासी जखमी; नाशिकच्या पिंपळगाव टोलजवळील घटना
Nashik Pimpalgaon Baswant Toll Plaza : चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस समोर असलेल्या टँकरला धडकली. यामध्ये 20 हून जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Nashik Accident : नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्याजवळ (Pimpalgaon Baswant Toll Plaza Accident) एसटी बस आणि टँकरची जोरदार धडक झाल्याने त्यामध्ये 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सायंकाळी 5 च्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पिंपळगाव टोल नाक्यावर एस टी महामंडळाच्या बसने टँकरला जोरदार धडक दिल्यानं 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखंमीवर पिंपळगाव बसवंतमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जळगाव आगाराची बस मुंबईच्या दिशेने जात असताना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर भरधाव वेगाने आलेल्या बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने टँकरला मागून धडक दिली. बसचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचे नियंत्रण सुटल्याची चर्चा आहे.
दरम्यान या टोल नाक्यावर नेहमीच कार, जीप आशा वाहनांचा रांगा असतात. बस टॅंकरवर धडकल्यानं सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी काही प्रवाशांना जबर मार लागला आहे.
भंडाऱ्यात उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक आदळला, चेंदामेंदा झालेल्या ट्रकच्या कॅबिनमध्ये फसून चालक गंभीर
भंडाऱ्यात कोळशाची वाहतूक करणारा ट्रक राष्ट्रीय महामार्गालगत उभा असताना पाठीमागून भरधाव आलेल्या सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सिमेंटच्या वाहतुकीच्या ट्रकच्या केबीनचा पूर्णतः चुराडा झाल्यानं त्यात अडकून चालक गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात भंडारा - रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील सालई -उसरा गावाजवळ घडला.
तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर जखमी चालकाला बाहेर काढून त्याला उपचारासाठी तुमसर येथे दाखल करण्यात आलं. दरम्यान या अपघातामुळं राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तासापर्यंत खोळंबून होती. अपघातग्रस्त ट्रकला दूर केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
ही बातमी वाचा: