North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील बातम्या वाचा इथे...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाचे अपडेट्स, सामाजिक, आर्थिक, राजकीय अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाचे अपडेट्स, सामाजिक, आर्थिक, राजकीय अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
पवार साहेब 50 वर्षांपासून राज्यातील जनता तुम्हाला सहन करतेय, अमित शाह शरद पवारांवर बरसले
मोदी गॅरंटी देण्यासाठी आलो आहे. तिसऱ्या वेळी सत्ता द्या, भारत जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या नंबरवर झेप घेईल. तुम्ही नोकरीला जाणार तिथे तुमचा बायोडाटा बघितला जाणार की नाही? मग पंतप्रधान बनविताना तुम्ही बायोडाटा बघणार की नाही बघणार?
10 वर्षाचा अनुभव आणि पुढील 25 वर्षाचे व्हिजन आहे, असा नेता पुन्हा पुन्हा नाही होत. मुद्रा लोण दिले, स्टार्टअप दिले, डिजीटल व्यवहार झालेत, रेल्वे ट्रॅक बनविले, रोज गॅस सिलेंडर 50 हजार लोकांना दिले, गरिबीतून लोकांना बाहेर काढले. नळाला पाणी आले.
पवार साहेब 50 वर्षांपासून राज्यातील जनता तुम्हाला सहन करते, तुम्ही 5 वर्षाचा आढावा द्या. तिसऱ्या वेळी मोदींना 400 पार खासदार नेण्यासाठी समर्थन करा.
राम मंदिर आधी बनायला हवे होते की नाही? काशी मथुरा कोरिडोर बनायला हवे होते की नाही? काँग्रेसने मतासाठी रामलल्लाला तंबूत ठेवले. आम्ही काशी विश्वनाथ कॉरिडॉर तयार केले.
आम्ही विधानसभांसाठी 30 टक्के जागा महिलांना आरक्षित ठेवणार. मोदी सरकारने लस देऊन भारताला कोरोन मुक्त केले. 2030 मध्ये जगतील 3 ऱ्या नंबरचे अर्थव्यवस्था आहे. सोनिया गांधी तिसऱ्यावेळी राहुल बाबाला लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2019 मध्ये लॉन्च झाले नाहीत.
महाविकास आघाडीवर हल्लाबोल
राज्यात 3 चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते, तिची तिन्ही चाकं पंक्चर झाली आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहेत
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या. 1 लाख मुलं डॉक्टर बनतील. G20 मध्ये महात्मा गांधी यांच्यासमोर जगभरातील नेते नतमस्तक होत होते.
अमित शाह यांचं भाषण LIVE : जळगावच्या सभेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल
अमित शाह यांचं भाषण LIVE























