(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News: नाशिकमधील अंबड रोडवर दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला, दोघांंचा मृत्यू
संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने दोन युवकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मेराज खान या 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
नाशिक: नाशिक (Nashik News) शहरात गुन्हेगारीने कळस गाठलेला असतांनाच अंबड लिंक रोडवरील घटनेने तर नाशिक शहर हादरले आहे. दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्राने दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला. मेराज खान (18 वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर इब्राईम शेख या तरुणावर नाशिक जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा देखील आरोप झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. दरम्यान, मृत मेराजच्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे.
पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय
नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने दोन युवकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मेराज खान या 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर इब्राईम शेखवर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय असून पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर रात्री दाखल झाले होते.
परिसरात तणावाचे वातावरण
विशेष गोष्ट म्हणजे पोलिसांचा निषेध आणि जिल्हा रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रात्री मयत मेरजला रुग्णवाहिकेतून थेट पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन गेले होते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घालताच पुन्हा रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयाकडे वळवण्यात आली होती. दरम्यान या घटनेनंतर अंबड लिंक रोडसह जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण पसरले होते. शीघ्र कृती दलासह चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
धुळ्यातील सांगवी गावात बॅनर फाडण्यावरुन दोन गटात वाद
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे आज सायंकाळच्या सुमारास बॅनर फाडण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला.दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली..यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला..या घटनेत आमदार काशीराम पावरा तहसीलदार आणि पोलिसांची एक गाडी फोडण्याचा देखील प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा :