![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik Crime : दिल्लीहून नाशिकला पर्यटनाला आली, नंतर गंगापूर धरण परिसरात मृत अवस्थेत आढळली, नेमकं काय घडलं?
Nashik Crime : दिल्लीहून (Delhi) नाशकात पर्यटनासाठी पतीसमवेत आलेल्या विवाहितेचा गंगापूर धरणात (Gangapur dam) मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
![Nashik Crime : दिल्लीहून नाशिकला पर्यटनाला आली, नंतर गंगापूर धरण परिसरात मृत अवस्थेत आढळली, नेमकं काय घडलं? Nashik Latest News Suicide of married woman who came to Nashik from Delhi for tourism with husband maharashtra news Nashik Crime : दिल्लीहून नाशिकला पर्यटनाला आली, नंतर गंगापूर धरण परिसरात मृत अवस्थेत आढळली, नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/39b1e6fa780c8c0b53ff9be9a7a6c9fa1696252903151738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिकमधून (Nashik) धक्कादायक घटना समोर आली असून दिल्लीहून (Delhi) नाशकात पर्यटनासाठी पतीसमवेत आलेल्या विवाहितेचा गंगापूर धरणात (Gangapur dam) मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक तालुका पाेलिसांच्या (Nashik Taluka Police) तपासात तिने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समाेर आले आहे. मृत महिलेने आत्महत्येपूर्वी पतीसमवेत एमटीडीसी रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर ती पतीच्या नकळत बाहेर गेली व पाण्यात उडी घेतल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिल्ली येथून नाशिकमध्ये (Nashik) पतीसमवेत पर्यटनासाठी आलेल्या विवाहितेचा मृतदेह गंगापूर धरणात आढळल्याने खळबळ उडाली. आदिती हरेंद्रसिंग राठोड असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला उपनगर हद्दीतून बेपत्ता झाल्याची नोंद तिच्या पतीने शुक्रवारी रात्री केली होती. शनिवारी दुपारी मृतदेह सापडल्यानंतर तालुका पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. आदितीचा भाऊ अखिल राठोड याने मृतदेह ओळखला. दरम्यान नाशिक तालुका पोलिसांनी केलेल्या तपासानुसार आदितीचा घातपात झाल्याचा कोणताही संशय नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर मृत महिलेच्या माहेरच्या नातलगांनी अद्याप कोणताही दावा केलेला नाही.
दरम्यान, आदिती व तिच्या पतीचे कुटुंबीयांच्या संमतीने काही महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. नाशिकमध्ये आल्यावर त्र्यंबकेश्वर, गड-किल्ले फिरुन धार्मिक पर्यटनानंतर दोघेही शुक्रवारी पर्यटन संचालनालयाच्या ग्रेप पार्क रिसॉर्टमध्ये (Grape Park Resort) गेले. तिथे जेवण केल्यानंतर पतीच्या नकळत आदिती रेस्टॉरंटबाहेर गेली. पतीने शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आदिती सापडली नाही. बराच संपर्क साधूनही होत नसल्याने पती नाशिकरोड परिसरात तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणी आला. तिथेही आदिती नसल्याने त्याने पोलिस ठाण्यात कळविले. दरम्यान गंगापूर धरण परिसरात तिचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. येथील शवविच्छेदन अहवालानुसार मृतदेहावर कोणत्याही जखमा नाहीत. पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे आदितीचा एकतर तोल गेला असावा अथवा तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आदितीच्या नातलगांनी अद्याप कोणताही आरोप न केल्याने पुढील गुन्हा दाखल नाही, मात्र तपास सुरुच आहे.
नेमकं काय घडलं?
काही महिन्यापूर्वी दिल्लीतील नवविवाहित जोडपे फिरण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. शहरातील उपनगर हद्दीत तात्पुरत्या वास्तव्याला होते. शुक्रवारी सायंकाळी आदिती बेपत्ता असल्याचे उपनगर पोलिसांत नोंद झाली. अदितीच्या पतीने नातलगांना याबाबत कळवल्यानंतर तातडीने आदितीचा भाऊ व मोजके नातलग नाशिकमध्ये पोहोचले. तर शनिवारी दुपारी गंगापूर धरण परिसरात आदितीचा मृतदेह आढळल्याने या सर्व प्रकारातील संशय वाढला. पोलिसांच्या माहितीनुसार, आदितीच्या नातलगांनी अद्याप कोणताही आरोप न केल्याने पुढील गुन्हा दाखल नाही. यासह आदितीच्या पतीचे वागणे संशयास्पद असले, तरी घातपाताचे कोणतेही पुरावे नसल्याने पोलिसांचा तपास सुरुच आहे.
इतर महत्वाची बातमी :
मुलगी झाली म्हणून सासरच्यांकडून छळ, अकोल्यात विवाहितेने रूग्णालयातच केली आत्महत्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)