Nashik News : नाशिककर कामाची बातमी! आज सकाळपासून सायंकाळपर्यंत रिक्षा-टॅक्सी सेवा बंद असणार, नेमकं कारण काय?
Nashik News : नाशिककरांसाठी महत्वाची बातमी असून आज सकाळपासून सायंकाळपर्यंत रिक्षा टॅक्सी सेवा (Rickshaw) बंद असणार आहे.
![Nashik News : नाशिककर कामाची बातमी! आज सकाळपासून सायंकाळपर्यंत रिक्षा-टॅक्सी सेवा बंद असणार, नेमकं कारण काय? Nashik Latest News Rickshaw-taxi services will be closed in Nashik city from today morning till evening maharashtra news Nashik News : नाशिककर कामाची बातमी! आज सकाळपासून सायंकाळपर्यंत रिक्षा-टॅक्सी सेवा बंद असणार, नेमकं कारण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/12/59e5fd23d2a67c5573dd8b36932f31361694495793005738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिककरांसाठी महत्वाची बातमी असून आज सकाळपासून सायंकाळपर्यत रिक्षा टॅक्सी सेवा (Rickshaw) बंद असणार आहे. रिक्षा चालक मालक आपल्या विविध मागण्यांसाठी आज सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व सेवा बंद (Rickshaw drivers Protest) ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे नाशिककरांचे मोठे हाल होणार असून यात विद्यार्थ्यांना नाहक फटका सहन करावा लागणार आहे.
नाशिक (Nashik) शहर व जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालकांच्या विविध मागण्यांबाबत प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस- महापालिकेस वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेरीस आज मंगळवारी नाशिक शहरातील रिक्षा, टॅक्सीचालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत शहरातील रिक्षा, टॅक्सी सेवा बंद (Rickshaw Taxi Closed) ठेवण्याचा निर्णय श्रमिक रिक्षा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. शहरातील रिक्षा, टॅक्सीचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख मामासाहेब राजवाडे यांनी दिली.
नाशिक शहरातील श्रमिक सेनेतर्फे रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालक यांनी विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना 21 जुलै रोजी लेखी निवेदन सादर केले होते. मात्र, त्याबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. परिणामी चालक अन् मालक नाहक भरडला जात आहेत. मात्र, त्यांच्याप्रति शासन उदासीन आहे. परिणामी प्रलंबित व इतर विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते 5 यावेळेत श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्याध्यक्ष भगवान पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, बाबासाहेब राजवाडे, शंकर बागुल, नवाज सय्यद, राजेंद्र वाघले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक- मालक आंदोलन करणार आहेत. आज सकाळपासून सायंकाळपर्यंत रिक्षा टॅक्सी टेम्पो सेवा बंद ठेवून आंदोलन केले जाणार असल्याची माहिती श्रमिक सेनेचे महानगर प्रमुख बाबासाहेब राजवाडे यांनी दिली आहे. मात्र या आंदोलनामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत.
असंख्य मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
दरम्यान श्रमिक सेनेकडून याबाबत मागण्यांचे निवेदन तयार करण्यात आले आहे. यात म्हटलंय की, स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेकडुन शहरात सिटीलिंक बससेवा सुरू करण्यात आली. मात्र सीटीलिंक बससेवा आजपर्यंतच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणा-या रिक्षा-टैक्सी चालकांचा रोजगार हिरावणारी आहे. सुमारे 23000 रिक्षा-टॅक्सी चालकांचे आयुष्य उदध्वस्त करणारी आहे. म्हणुनच या सिटीलिक बससेवेच्या विरोधात हे आंदोलन आहे. सिटीलिंक चालविण्यासाठी खर्च करण्यात येणारा पैसा हा नाशिकमधील रहिवाशांच्या करातून करण्यात येतो, परंतु त्याचा फायदा महानगरपालिकबाहेरील गावांना होत आहे. हा प्रकार त्वरीत थांबायला हवा व जनतेचा पैसा शहर विकासासाठीच वापरला जावा. नाशिक शहरातून बेकायदा चालु असणारी ओला उबेर बंद करण्यात यावी. शासनाकडुन प्रवासी भाडयामध्ये एसटी महामंडळाच्या बसमध्ये बसल्यास महिलांना 50 टक्के, दिव्यांगांना 75 टक्के व वृध्दांना 100 टक्के सवलत दिली जाते, त्याच धर्तीवर रिक्षा-टॅक्सी चालकांना शासनाकडुन अनुदान देण्यात यावे, यासह अनेक मागण्या आंदोलनातून पुढे करण्यात आलेल्या आहेत.
इतर महत्वाची बातमी :
Nashik News : नाशिकमध्ये नादखुळी रिक्षा सौंदर्य स्पर्धा, 21 हजारांचं बक्षीस अन् एक लाखांचा विमाही!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)