(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Traffic Police : मुंबई वाहतूक पोलिसांकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे प्रबोधन, तक्रार आल्यास कारवाई करण्याचा इशारा
Mumbai Traffic Police : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वाहतूक पोलिसांनी (Mumbai traffic police) शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
Mumbai Traffic Police : वाहतूक पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रवासादरम्यान रिक्षा (rickshaw) आणि टॅक्सी (taxi) चालकांच्या अरेरावीचा सामना करावा लागतो. मात्र आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वाहतूक पोलिसांनी (Mumbai traffic police) शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील सहार वाहतूक पोलिसांनी शेकडो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना एकत्रित करुन त्यांचे प्रबोधन केले. कोणताही रिक्षा आणि टॅक्सी चालक भाडे नाकारु शकत नाही किंवा प्रवाशांसोबत उद्धट भाषा वापरु शकत नाही अशा सूचना वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना दिल्या. तसेच कारवाईचा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
तक्रारी आल्यास वाहतूक पोलीस कारवाई करणार
भाडे नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकाच्या विरोधात मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील सहार वाहतूक पोलिसांनी शेकडो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना एकत्रित करुन त्यांचे प्रबोधन केले. यावेळी सहारा वाहतूक विभागाचे पी आय योगेश तांदळे यांनी रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले. कोणताही रिक्षा आणि टॅक्सी चालक भाडे नाकारु शकत नसल्याचे तांदळे यांनी सागंतिले. तसेच कोणत्याही प्रवाशांसोबत तुम्ही उद्धट भाषा वापरु शकत नाही अशा सूचना देखील वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना दिल्या आहेत. जर अशा काही तक्रारी वाहतूक पोलिसांकडे आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
प्रवाशांची कोणताही गैरसोय होणार याची रिक्षा चालकांकडून अपेक्षा
मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी आम्ही रिक्षा आणि ट्रक्सी चालकांची बैठक घेतली. विशेषत: अंधेरी पूर्व विभाग, विमानतळ परिसर या परिसारातील रिक्षा चालकांची बैठक घेतो. यामध्ये त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भातील सूचना केल्या जातात. तसेच काही रिक्षाचालक ज्यादा भाडे आकारतात, ज्यादा प्रवासी वाहतूक करतात, गणवेश परिधान करत नाहीत, त्यामुळं याबाबत आम्ही रिक्षाचालकांचा सूचना करत असल्याची माहिती वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या काळात प्रवाशांची कोणताही गैरसोय होणार नाही याची रिक्षाचालकांकडून आम्हाला अपेक्षा असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. तसेच कोणताही रिक्षा आणि टॅक्सी चालक भाडे नाकारु शकत नाही किंवा प्रवाशांसोबत उद्धट भाषा वापरु शकत नाही अशा सूचना वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Exclusive Akshay Kelkar Bigg Boss Marathi Winner : रिक्षा चालकाचा मुलगा ते ; 'बिग बॉस'चा विजेता; जाणून घ्या अक्षय केळकरचा प्रवास...