एक्स्प्लोर

Nashik Rain : नाशिकमध्ये पावसाची उघडीप, दोन दिवस धो धो बरसला, पुन्हा उघडला, चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम

Nashik Rain Update : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात दोन दिवस धो धो बरसल्यानंतर काल दुपारपासून पावसाने उघडीप दिली आहे.

नाशिक : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात दोन दिवस धो धो बरसल्यानंतर काल दुपारपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या पावसामुळे गोदावरीला आलेला पूरही ओसरला असून नाशिकसह गंगापूर (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून विसर्गही घटविण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांना दोनच दिवस गोदावरी खळाळून वाहताना पाहायला मिळाली. कालपासून पावसाने पुन्हा उघडीप दिली असून अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. 

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने (Nashik rain) सुरवात केली. त्यानंतर जवळपास 48 तास नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले, झाडे उन्मळून पडली, गोदावरीला हंगामातील (Godawari) पहिला पूर आला. या पावसाने जिल्हावासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र हा आनंद काही तासांपुरताच ठरला. कारण दोन दिवस मुसळधार हजेरी लावल्यानंतर शनिवारी दुपारपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने गंगापूरसह अन्य धरणांमधील विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला आलेला पुरही ओसरला आहे. गोदाकाठावरील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. 

दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले होते. गंगापूर धरण 95 टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला होता. गोदावरी नदीकाठी पूरसदृश स्थिती होती. पावसाचा जोर कमी झाला असल्याने गंगापूर धरणातून (Gangapur Dam) विसर्ग कमी करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 9 हजार 88 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. शनिवारी सकाळी 6 वाजता तो कमी करून 5 हजार 432 करण्यात आला. मात्र त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग हळूहळू थेट बंद करण्यात आल्याने गोदावरी पूर परिस्थिती पूर्वपदावर आली. नाशिक शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी पहाटेपासून अचानक पावसाचा जोर कमी झाला. गंगापूर धरण परिसरातही पावसाने चांगलीच उघडीप दिली. यामुळे धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्याने नदीची पूरस्थिती घटल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

गोदाकाठावरील परिस्थिती पूर्वपदावर 

दोन दिवस नाशिक शहरासह सर्वदूर झालेल्या पावसाने सर्वांना मोठा दिलासा मिळाला. शुक्रवारी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे जोरदार पाऊस झाला. शनिवारी जिल्ह्याला 'यलो अलर्ट' होता. यामुळे शहरासह जिल्ह्यातही फारसा जोरदार पाऊस झाला नाही. परिणामी शुक्रवारी वेगाने विविध धरणांमधून वाढविलेला विसर्ग शनिवारी सकाळपासून तितक्याच वेगाने पाटबंधारे खात्याकडून कमी करण्यात आला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होताच गोदावरीची पूरस्थितीही हटली. एकूणच गोदावरीचा पूर रात्रीपर्यंत पूर्णतः ओसरला होता. शनिवारी दुपारनंतर गोदाकाठावरील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले होते. शुक्रवारच्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची दैनावस्था झाली. भुयारी गटारींचे चेंबरही ठिकठिकाणी तुडुंब भरुन वाहत होते. शनिवारीही काही भागात चेंबरमधून पाणी ओथंबून वाहताना नजरेस पडले.

 

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Rain : गोदामाई पाहुणी आली! नाशिक जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटिंग, डोळे दिपवणार गोदावरीचे विहंगम दृश्य

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget