एक्स्प्लोर
Nashik Rain : गोदामाई पाहुणी आली! नाशिक जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटिंग, डोळे दिपवणार गोदावरीचे विहंगम दृश्य
Nashik Rain : नाशिकची जीवनवाहिनी म्ह्णून गोदावरी नदीची ओळख आहे, यंदा अनेक दिवसांनंतर गोदावरी मनभरून वाहू लागली आहे.

Nashik Godavari flood
1/10

नाशिकची जीवनवाहिनी म्हणून गोदावरी नदीची ओळख आहे, यंदा अनेक दिवसांनंतर गोदावरी मनभरून वाहू लागली आहे.
2/10

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने नाशिकसह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने आभाळमाया केली आहे.
3/10

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
4/10

गोदावरीच्या पुराचे मापक म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीला देखील पावसाने अंघोळ घातली आहे.
5/10

त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येत असून धरणातील पाणी नदीत प्रवाहीत झाल्याने गोदामाई खळाळली आहे.
6/10

अनेक दिवसांपासून पाऊसच नसल्याने यंदा गोदामाई खळाळली नव्हती, तसेच दुतोंड्या मारुतीला पुराचे पाणीच लागलेले नव्हते.
7/10

पावसाची धुवांधार बॅटिंग सुरु असल्याने गंगापूर धरणातील पाणी नदीत प्रवाहीत झाल्याने गोदामाई खळाळली आहे.
8/10

तर अनेक दिवसांनंतर दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागल्याने नाशिककर सुखावले आहेत.
9/10

गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने गोदावरी नदीत विसर्ग सुरु आहे, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वीस टक्क्यांची वाढ झाली आहे.
10/10

पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Published at : 09 Sep 2023 01:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion