(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : 'इकडे मनोज जरांगे पाटील म्हणाले, अंत्ययात्रा निघाली तरी मागे हटणार नाही, तिकडे मंत्री छगन भुजबळही म्हणतात मेलो तरी हरकत नाही!'
Chhagan Bhujbal : एकीकडे मनोज जरांगे यांची सभेत मागे हटणार नाही, असे म्हणत असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांनीही मेलो तरी हरकत नाही, असा निर्धार केला आहे.
नाशिक : 'मला वारंवार फोन, मॅसेज येत असून धमकी दिली जात आहे. पण अशा धमक्यांना घाबरणारा मी नाही. कुठलंही संकट असो ध्येर्याने तोंड देणारा माणूस आहे. धमकीतून मारायची भाषा केली जात आहे', समाजाच्या चांगल्यासाठी मेलो तर काय बिघडलं? अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी आलेल्या धमकीनंतर दिली. त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे यांची सभेत मागे हटणार नाही, असे म्हणत असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांनीही मेलो तरी हरकत नाही, असा निर्धार केला आहे.
आज एकीकडे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज मराठ्यांचा लाखोंचा जनसमुदाय उभा राहिला. गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. यात त्यांनी विविध जिल्ह्याचा दौरा करत मराठा बांधवाना आवाहन करत आरक्षणासाठी एकजुटीचे आवाहन केले. हे सर्व सुरु असताना मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणावरून चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. आज एकीकडे सभा सुरु असताना दुसरीकडे भुजबळांना धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली. यावर मंत्री छगन भुजबळ यांना धमकी आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. म्हणाले, मारायची भाषा करतात, लोक आजारपणात, अपघातात मरतात, समाजाच्या चांगल्या कामासाठी मेलो तर चांगले आहे, अशी पहिली प्रतिक्रियामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात 375 जाती राज्यात असून मी काही एका जातीचे प्रतिनिधित्व करत नाही, एका वर्गाचे प्रतिनिधित्व करत आहेत. शेवटपर्यंत ओबीसी वर्गासाठी काम करत राहणार असून धमकी दिली जात आहे. पण मी धमक्यांना भीक घालणार नाही. मारायची भाषा करतात, समाजाच्या चांगल्या कामासाठी मेलो तर चांगले आहे, लोक आजारपणात, अपघातात मरतात, मग चांगल्या कामासाठी मेलो तर काय बिघडलं? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. दरम्यान नाशिक शहरातील भुजबळ फार्मवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर भुजबळ यांचा उद्या वाढदिवस असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची तपासणी केली जाणार असून भुजबळांच्या थेट जवळ जाणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला आहे.
मनोज जरांगे भुजबळांवर बरसले...
दर्या गेल्या काही दिवसांपासून भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात वाद सुरु आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या सभेसाठी पैसे कुठून येतात असा सवाल केला होता. याला मनोज जरांगे यांनी देखील सडेतोड उत्तर दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे यांनी हिशोबच उलगडून दाखवला. जरांगे म्हणाले की, 'महाराष्ट्रतला मराठा समाज निधी देणार होता, जाहीर सांगतो. पण आम्ही सांगितलं, आम्हाला सेवा करायची आहे, एक रुपयाही नको. आम्ही 123 गावातून निधी गोळा केला आणि त्यातून 21 लाख जमा झाले. लगेच हिशोब घे म्हणावं त्याला सात कोटी वाल्याला. हे मराठ्यांना सांगणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी नाही, ते सात-आठ वेळा जाऊन आलंय, आणखी जायची वेळ आली त्याची परत, असं म्हणत छगन भुजबळांना जरांगेंनी सणसणीत टोला लगावला.
इतर महत्वाची बातमी :